Sharmila Thackeray On Uddhav Thackeray: राजा तेव्हा बंगल्यावर होता...; शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, एकनाथ शिंदेंनाही सुनावलं!
Sharmila Thackeray On Uddhav Thackeray: आपल्या महिलांना 1500 रुपये भिक द्यायची गरज नाही, असा निशाणा शर्मिला ठाकरेंनी साधला.
Sharmila Thackeray On Uddhav Thackeray: ठाणे विधानसभा मतदारसंघातून (Maharashtra Vidhan Sabhe Election 2024) मनसेचे अविनाश जाधव (Avinash Jadhav) निवडणुकीच्या रिंगणात आहे. अविनाश जाधव यांचा जोरदार प्रचार सुरु असून काल मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी ठाण्यातील गोकुळनगर भागात चौक सभा घेतली. यावेळी शर्मिला ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
स्वातंत्र्यापासून सर्व पक्ष सत्तेत आहेत, दादर माहीममध्ये कोळी वस्तीत वाईट अवस्था आहे. बेसिक सुविधा पुरवू शकत नाही, मी स्वत: 10 वेळा पाण्यात पडता पडता वाचले, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. तसेच मला शुभेच्छा देऊन जायला सांगितल आहे पण मला बोलायचं आहे. मला टिप्पणी करायची नसली तरी 75 वर्षे येवढे मोठे पक्ष सत्तेत असूनही सर्वसामान्यांना सुविधा देऊ शकला नाही, असं शर्मिला ठाकरेंनी सांगितलं.
महिलांना 1500 रुपये भिक द्यायची गरज नाही- शर्मिला ठाकरे
कोळीवाड्यात गटार उघडे होते. आजही 25 वर्षे सत्तेत असणारी शिवसेना गटरवर झाकण लावू शकत नाही. मुंबई गोवा महामार्ग झाला नाही. आपल्या आमदार खासदारांची भूक तरी किती? असा सवाल उपस्थित करत तुमचं पोट भरल्यावर तरी काम करा, अशी टीका शर्मिला ठाकरेंनी केली. 1500 रुपये बहिणींना फुकट देण्यापेक्षा शेतकरी मालाला भाव द्या...आपल्या महिलांना 1500 रुपये भिक द्यायची गरज नाही, असं म्हणत शर्मिला ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकारला देखील सुनावलं आहे.
शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल-
अडीच वर्षे मुख्यमंत्री होते ते दोन वेळा मंत्रालयात गेले. याबाबत शरद पवार यांनी पुस्तकात लिहिलं आहे. राजा मैदानात उतरायला हवा होता, पण राजा बंगल्यावर होता, असा हल्लाबोल शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.
24 तास 24 तासांत अविनाश जाधव काम करतो- अभिजीत पानसे
तुम्ही टीव्हीवर बघत असाल की शर्मिला वहिनी अमित ठाकरेंच्या प्रचारासाठी माहीम आणि दादर परिसरात घराघरात जात असतात. जसं अमित ठाकरे त्यांचा मुलगा आहे तसेच दुसरा मुलाप्रमाणे अविनाश जाधव यांच्यावर देखील प्रेम आहे. मी काय फार बोलतं नाही. त्यांच्या आशीर्वाद आणि शुभेच्छा महत्त्वाचा आहे. 24 तास 24 तासात अविनाश जाधव काम करतो. अविनाश जाधव यांच्या पाठीशी उभे रहा, मी विश्वास देतो. तुमचं मत फुकट जाणार नाही. त्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला मतदान करा आणि 365 दिवस अविनाश जाधव तुमच्यासाठी उपलब्ध असेल, असं मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी सांगितले.