एक्स्प्लोर

Thackeray Vs Shinde Rada: मुंबईत ठाकरे गट-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, जोगेश्वरीत मध्यरात्री जोरदार राडा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: जोगेश्वरीत ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. जोरदार राडा

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना मंगळवारी रात्री मुंबईत जोरदार राडा झाला. जोगेश्वरीत शिंदे गट (Shinde Camp) आणि ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Camp) कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर (Ravindra Vaikar) यांचे कार्यकर्ते महिलांना वस्तूंचे वाटप करत असल्याचे वृत्त मतदारसंघात पसरले होते. यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते मातोश्री क्लब (Matoshree Club) येथे जाब विचारायला गेले होते. यावेळी दोन्ही बाजूचे शिवसैनिक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने राडा झाला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा मोठा जमाव मातोश्री क्लबबाहेर जमला होता. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी सुरु होती. यावेळी वायकरांच्या कार्यकर्त्यांनी गेटच्या आतून दगडफेक केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. त्यामुळे मातोश्री क्लबच्या बाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. 

हा सगळा गोंधळ सुरु असताना याठिकाणी ठाकरे गटाचे जोगेश्वरी पूर्वचे उमेदवार बाळा नर सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. तेदेखील शिवसैनिकांबरोबर राड्यात आघाडीवर दिसले. मातोश्री क्लब इथे गेल्यानंतर  वायकरांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणे आहे. पोलिसांनी दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली.

या सगळ्या राड्यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब याठिकाणी आले होते. त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. मुंबईत सगळीकडे हेच सुरु आहे. अनेक ठिकाणी पैसेवाटप, धान्यवाटप सुरु आहे. गेले अनेक दिवस मातोश्री क्लबवर पैसे वाटले जात आहेत. आम्ही याबाबत निवडणूक आयोगाला कळवले आहे. मातोश्री क्लबवर गुंडआहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी आम्ही इथे आलो आहोत, असे अनिल परब यांनी म्हटले. 

हेच का ठाकरे गटाचे संस्कार, शीतल म्हात्रेंचा हल्लाबोल 

कालच्या राड्यानंतर शिंदे गटाच्या धडाडीच्या महिला नेत्या शीतल म्हात्रे यादेखील घटनास्थळी आल्या होत्या. त्यांनी ठाकरे गटावर आगपाखड केली. त्यांनी म्हटले की, मातोश्री क्लबबाहेर ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते शूटिंग काढत होते. आमच्या महिलांनी जाब विचारला तर कार्यकर्त्यांनी महिलांवरती हात उचलला. हे ठाकरे गटाचे संस्कार का, हा सवाल मला उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना विचारायचा आहे, असे  शीतल म्हात्रे यांनी म्हटले. आम्हाला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. ठाकरे गटाचे गुंड याठिकाणी आले होते, त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी केली. 

आणखी वाचा

गद्दार म्हणताच एकनाथ शिंदेंच्या डोक्यात तिडीक गेली, गाडीतून उतरुन रागात नसीम खान यांच्या कार्यालयात शिरले अन्...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
Embed widget