Astrology : आज द्विपुष्कर योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; कुंभसह 'या' 5 राशींवर बरसणार शनिदेवाची कृपा
Astrology Panchang 07 December 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजच्या दिवशी जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशीचे लोक धार्मिक कार्यात सहभागी होतील.
Astrology Panchang 07 December 2024 : आज 7 डिसेंबर शनिवारचा दिवस. आज मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे. या तिथीला स्कंद चम्पा षष्ठीच्या नावाने देखील ओळखलं जातं. आजच्या दिवशी द्विपुष्कर योग (Yog), रवि योग तसेच, धनिष्ठा नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजच्या दिवशी जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशीचे लोक धार्मिक कार्यात सहभागी होतील. तसेच, तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. या लकी राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी असणार आहे. आज तुमच्यावर शनिदेवाची विशेष कृपा असणार आहे. तसेच, तुम्ही नियोजित केलेली कामे वेळेत पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज तुमचं मन धार्मिक कार्यात गुंतेल. संध्याकाळच्या वेळी जवळपासच्या मंदिराला भेट द्या. तसेच, कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घेतल्याशिवाय घराबाहेर पडू नका.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमची अनेक दिवसांनंतर तुमच्या मित्रपरिवाराशी भेटीगाठी होतील. तसेच, कामाच्या ठिकाणी देखील वातावरण प्रसन्न पाहायला मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. नवीन व्यवसायात तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी नवीन ऑर्डर्स येतील. त्यामुळे तुम्ही फार आनंदी असाल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला धनप्राप्ती होऊ शकते. तसेच, आजच्या दिवशी तुमची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. धार्मिक यात्रेला जाण्याचा योग लवकरच जुळून येणार आहे. तसेच, तुमचे वैवाहिक नातेसंबंध चांगले पाहायला मिळतील. विद्यार्थ्यांनी आळस करुन चालणार नाही.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असेल. आज तुम्हाला अनावश्यक खर्च टाळावा लागेल. तसेच, तरुणांना रोजगाराच्या चांगल्या संधी मिळतील. तुमचा व्यवासायाच्या दृष्टीने कल चांगला असेल. आज तुम्हाला रोजच्या धावपळीपासून आराम मिळेल. त्यामुळे तुम्ही हा वेळ सत्करणी चालवू शकता.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज शनिदेवाच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तसेच, तुमच्या कुटुंबात अनेक दिवसांपासून जे वाद सुरु होते ते वाद लवकरच संपतील आणि घरातील वातावरण आनंदी असणार आहे. घरात पाहुण्यांची ये-जा असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: