Astrology : आज शिव योगासह बनले अनेक शुभ योग; वृषभसह 5 राशींच्या धनात होणार वाढ, आर्थिक स्थिती उंचावणार
Panchang 07 August 2024 : आज श्रावणाचा तिसरा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, याचा 5 राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे. वृषभसह 5 राशींवर आज हनुमंताची विशेष कृपा राहील, आजचा दिवस लाभाचा असेल. आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Astrology 07 August 2024 : ग्रहांच्या स्थितीनुसार, आज श्रावणाचा तिसरा दिवस विशेष आहे. आज बुधवार, 7 ऑगस्ट रोजी चंद्र कन्या राशीत जाणार आहे. तसेच, आज श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे आणि या तिथीला हरियाली तीजचा सण साजरा केला जातो. आज परिधी योग, शिवयोग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व वाढलं आहे. आज बनत असलेल्या शुभ योगांचा 5 राशींना फायदा होणार आहे, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. वृषभ राशीचे लोक आज मोठे निर्णय सहजपणे घेऊ शकतील आणि त्यांना अनपेक्षित आर्थिक लाभही मिळतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरदार लोक त्यांच्या बॉसचे मन जिंकण्यात यशस्वी होतील. ज्या लोकांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना चांगलं यश मिळेल आणि नफा देखील मिळेल. सासरच्या घरात काही समस्या चालू असतील तर बाप्पाच्या कृपेने त्या दूर होतील आणि सर्वांचं सहकार्य मिळेल.
सिंह रास (Leo)
आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी विशेष फलदायी असणार आहे. सिंह राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळेल. आज लव्ह लाईफमधील सर्व प्रकारचे गैरसमज दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक डेटवर जाण्याची संधीही मिळेल. नोकरदार लोकांना उत्पन्न वाढण्याचे नवीन मार्ग मिळतील. जर तुम्हाला भागीदारीत व्यवसाय करायचा असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ राहील. आज तुम्ही जुन्या मित्रांनाही भेटू शकता.
धनु रास (Sagittarius)
आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे. आज तुम्ही पैसे वाचवू शकाल आणि कुटुंबाची प्रत्येक गरज पूर्ण करू शकाल. नोकरदार लोक त्यांच्या मित्रांच्या सहकार्याने आज नवीन नोकरीचा शोध पूर्ण करतील, ज्यामुळे त्यांचं उत्पन्न देखील वाढेल. जाणकार आणि अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने व्यवसायात खूप फायदा होईल. जर तुम्ही कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या आरोग्याबाबत चिंतेत असाल तर तुमची समस्या दूर होईल.
कुंभ रास (Aquarius)
आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप फलदायी असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना आज बाप्पाच्या कृपेने जीवनात सुरू असलेल्या समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि आज तुमच्या घरात विशेष पाहुणेही येऊ शकतात. अविवाहित लोकांना आज कोणी खास भेटण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला ही मैत्री आणखी पुढे नेण्याची इच्छा असेल. व्यवसायात गुंतलेले लोक आज भरीव नफा कमावतील. नोकरीत असलेल्या लोकांना आज सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल आणि ऑफिसमधली कामं मस्तीमध्ये पूर्ण करता येतील.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला जाणार आहे. विद्यार्थ्यांना आज शिक्षकांचं सहकार्य मिळेल. आज तुमचं सोशल सर्कल वाढेल. नोकरदार लोक आज कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करतील आणि करिअरमध्ये प्रगती करतील. आज तुम्ही कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार कराल. तुम्ही तुमच्या पालकांशी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी वेळ घालवाल आणि तुम्हाला त्यांचा चांगला सल्लाही मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :