एक्स्प्लोर

Astrology : आज त्रिपुष्कर योगासह जुळून आले अनेक शुभ योग; 'या' 5 राशींना धनप्राप्तीच्या मार्गात मिळणार यश, सर्व इच्छा होणार पूर्ण

Panchang 06 July 2024 : आज शनिवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, याचा 5 राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे. मिथुनसह 5 राशींवर आज शनिदेवाची विशेष कृपा राहील, आजचा दिवस लाभाचा असेल. आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology 06 July 2024 : ग्रहांच्या स्थितीनुसार आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज शनिवार, 6 जुलै रोजी चंद्र कर्क राशीत जाणार आहे. तसेच आज आषाढ मासातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी असून  आज हर्षण योग, त्रिपुष्कर योग आणि पुनर्वसु नक्षत्र यांचा शुभ संयोग असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. आज कोणत्या 5 राशींना नशिबाची सर्वाधिक साथ मिळणार? जाणून घेऊया आजच्या भाग्यवान राशी...

मिथुन रास (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. मिथुन राशीच्या लोकांनी आज कोणतंही काम जिद्दीने केलं तर तुम्हाला त्यात यश मिळेल आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनाही चांगली बातमी मिळेल. तुम्ही घेतलेले निर्णय योग्य असल्याचं सिद्ध होईल आणि मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेतही कराल. भाऊ-बहिणीच्या नात्यात काही अडचण येत असेल तर आज ती संपून नाती पुन्हा घट्ट होतील. व्यवसायात प्रयत्न केल्याने तुम्हाला चांगलं यश मिळेल आणि आर्थिक लाभ मिळवू शकाल. वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि तुमच्या पालकांशी तुमचे संबंध चांगले राहतील.

कन्या रास (Virgo)

आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात एक नवी पहाट घेऊन येईल. शनिदेवाच्या आशीर्वादामुळे कन्या राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे आणि समाजात तुमचा मानही वाढेल. व्यावसायिक जीवनात यश मिळण्याची शक्यता आहे. परदेशात जाण्याचा प्रयत्न करत असाल तर आज यश मिळू शकतं. कुटुंबात आज काही शुभ घटना देखील घडू शकतात. जर तुम्ही आज काही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर एखाद्या तज्ञाचा आणि तुमच्या जोडीदाराचा सल्ला जरूर घ्या, तरच तुम्हाला यश मिळेल. मालमत्ता आणि वाहन खरेदीची शक्यता आहे.

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. आज वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल होतील आणि तुम्ही सुखसोयींनी भरलेलं जीवन जगाल. व्यवसायिकांचा दिवस नफ्याचा असेल. दुसरीकडे, नोकरदार वर्ग सर्व अडचणी असूनही चांगली प्रगती साधतील आणि त्यांच्या करिअरमध्येही चांगली प्रगती होईल. लव्ह लाईफबद्दल बोलायचं झालं तर, तुमच्या प्रियकरासोबत तुमचा चांगला ताळमेळ राहील आणि तुम्ही तुमच्या भावना एकमेकांसमोर व्यक्त करू शकाल. आई-वडिलांच्या आरोग्याची चिंता दूर होईल आणि कुटुंबात सुख-शांती नांदेल.

मकर रास (Capricorn)

आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे. मकर राशीचे लोक आज जीवनाचा आनंद लुटताना दिसतील. कुटुंबात काही वाद चालू असतील तर ते आज वडीलधाऱ्यांमार्फत सोडवले जातील आणि तुमची प्रलंबित घरातील कामंही पूर्ण होतील. वैवाहिक जीवन छान असेल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी भेटवस्तू देखील खरेदी करू शकता. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल, तुमची मेहनत तुम्हाला सर्व प्रकारचे यश मिळवून देईल. व्यवसाय वाढीसाठी तुमच्या काही कल्पना सर्वांना प्रभावित करतील आणि भविष्यात चांगला नफा देखील मिळवतील. आरोग्य चांगलं असेल. तुम्हाला मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याची संधी देखील मिळेल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल.

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. मीन राशीच्या लोकांना आज अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि ते नोकरी तसेच व्यवसायाच्या क्षेत्रात चांगली उंची गाठतील. वैवाहिक जीवनात गोडवा येईल आणि कुठेतरी प्रवासाची योजना बनेल, यामुळे तुमच्या जोडीदाराच्या चेहऱ्यावर आनंदाची भावना दिसेल. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही नवीन प्रकल्पांवर काम करायला मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल. शनिदेवाच्या कृपेने परदेशात जाण्याची शक्यता प्रबळ होईल आणि तुम्ही तुमच्या आरोग्याबाबतही जागरूक राहाल. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर त्यातून आर्थिक फायदा होईल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 06 July 2024 : आज 'या' राशींवर राहणार शनीची कृपा; अडकलेली कामं लागणार मार्गी, वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : ना पवार - ना ठाकरे...फडणवीसांच्या रडारवर जयंतराव; स्फोटक भाषणAjit Pawar Full Speech Igatpuri : वक्फ बोर्डावरु उद्धव ठाकरेंना टोला,अजित पवार गरजले-बरसलेAmit Shah Bag Check : अमित शाहांनाही रोखलं,निवडणूक पथकाने तपासली एक-एक बॅग!CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Embed widget