Horoscope Today 06 July 2024 : आज 'या' राशींवर राहणार शनीची कृपा; अडकलेली कामं लागणार मार्गी, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 06 July 2024 : तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 06 July 2024 : पंचांगानुसार, आज 06 जुलै 2024, शनिवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
गुप्तशत्रू थोडे त्रास देतील अशावेळी श्रद्धा आणि सत्संग यांचा मागोवा घ्यायला लागेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लांबचा प्रवास करावा लागेल. नोकरी धंद्यात कोणतीही गोष्ट व्यवहाराच्या मुशित घालून तपासून घ्या.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पुढे जाणारे ग्रहमान आहे. प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मिळण्यासाठी जीवाचे रान कराल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
महिलांनी क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे हे लक्षात ठेवावे. पैशाच्या बाबतीतले कोणतेही निर्णय घाई घाईने घेऊ नयेत.
सिंह रास (Leo Horoscope Today)
सर्व वयातील मुलांकडे पालकांना लक्ष द्यावे लागेल. स्वतःच्या सुखाकडे न बघता दुसऱ्यांचा विचार जास्त कराल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
घरातील व्यक्तींच्या आवश्यक गरजांसाठी पैसा खर्च करावा लागेल. महिला प्रयत्नांची शिकस्त करतील.
तूळ रास (Libra Horoscope Today)
तुमच्या कामात आज नाविन्याची झलक दिसेल. लोकांसमोर स्वतःला व्यक्त करताना प्रयत्नांची चिकाटीची जोड आवश्यक ठरेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
स्वतःचे अनुभव घेत असताना सांगू नका आपल्याला नक्की काय मिळवायचे हे तुम्हाला चांगलं समजेल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
चांगले संकल्प करा आणि ते पाळण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करा यश तुमचं आहे.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
अनावश्यक गोष्टींना फाटा देऊन आपली इच्छाशक्ती आणि उत्साह वाढवा
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
यश मिळवण्यासाठी पहिलं पाऊल प्रयत्नांचा टाकावं लागतं हे ओळखा
मीन रास (Pisces Horoscope Today)
आज दुप्पट वेगाने कामाला सुरुवात कराल. नवीन आव्हाने पेलाल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: