Astrology Panchang 04 October 2024 : आज कला योगसह जुळून आले अनेक शुभ संयोग; कन्यासह 5 राशींची चांदीच चांदी, होणार बक्कळ धनलाभ
Astrology Panchang 04 October 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशींच्या लोकांना होणार आहे.
Astrology Panchang 04 October 2024 : आज 4 ऑक्टोबरचा दिवस अनेक राशींसाठी खास असणार आहे. आज अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. आजच्या दिवशी देवीच्या दुसऱ्या रुपाची पूजा केली जाते. तसेच, आज कला योग (Yog), बुधादित्य योग आणि चित्रा नक्षत्र यांसारखे अनेक शुभ संयोग जुळून आले आहेत. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशींना (Zodiac Signs) देवी लक्ष्मीच्या कृपेने चांगला धनलाभ होईल. यामुळे तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. तसेच, सुखाचे दिवस येतील. या 5 लकी राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला नातेवाईकांकडून शुभ वार्ता मिळू शकते. तसेच, तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गातील लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा मिळेल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला यश येईल. आज तुम्ही शुभ कार्यासाठी पैसे खर्च करु शकता. तसेच, वैवाहिक जीवनात जोडीदाराचा पाठिंबा तुम्हाला मिळेल. घरातील वातावरणही प्रसन्न असेल. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही संतुष्ट असाल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी आजचा दिवस सुखकारक असणार आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा तुमच्यावर आशीर्वाद असणार आहे. तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण झाल्या कारणाने तुम्ही फार खुश असाल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर असलेले जुने वाद मिटतील त्यामुळे तुमच्या मनावरचं दडपण कमी होईल. एकंदरीतच तुम्ही आज प्रसन्न असाल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमचा गेलेला पैसा पुन्हा येण्याची शक्यता आहे. तसेच, शारीरित आणि मानसिक अशा दोन्ही गोष्टीत तुम्ही मजबूत असणार आहात. आजच्या दिवशी तुम्ही महत्त्वाचं कार्य हाती घेऊ शकता. तसेच, राजकीय क्षेत्रातही तुमची प्रगती दिसून येईल. संध्याकाळी तुम्ही कुटुंबियांबरोबर धार्मिक कार्याला भेट देऊ शकता.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुम्ही जे काही काम कराल त्यामध्ये तुम्ही समाधानी असाल. तसेच, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचाही तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. त्यामुळे तुमचं दडपण कमी होईल. नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. तसेच, आरोग्यातही सुधारणा होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: