Astrology : आज गजकेसरी योगासह जुळून आले अनेक शुभ योग; 'या' 5 राशींना प्रत्येक कामात मिळणार यश, जोडीदारासोबतचे बंधही होतील मजबूत
Panchang 03 July 2024 : आज बुधवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, याचा 5 राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे. मिथुनसह 5 राशींवर आज हनुमंताची विशेष कृपा राहील, आजचा दिवस लाभाचा असेल. आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Astrology 03 July 2024 : ग्रहांच्या स्थितीनुसार आजच्या दिवसांचं महत्त्व वाढलं आहे. आज बुधवार, 3 जुलै रोजी, चंद्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे, जिथे गुरु आधीच उपस्थित आहे. आज गुरु आणि चंद्र एकाच राशीत असल्यामुळे गजकेसरी योग तयार होत आहे. तसेच आज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी असून या दिवशी गजकेसरी योगासह सर्वार्थ सिद्धी योग आणि रोहिणी नक्षत्राचाही शुभ संयोग असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. आज कोणत्या 5 राशींना नशिबाची सर्वाधिक साथ मिळणार? जाणून घेऊया आजच्या भाग्यवान राशी...
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. सिंह राशीच्या लोकांच्या अनेक अपूर्ण इच्छा आज पूर्ण होतील आणि त्यांच्या सुख-सुविधांमध्येही चांगली वाढ होईल. बाप्पाच्या कृपेने तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सुरू असलेल्या समस्यांपासून आराम मिळेल, ज्यामुळे जीवनात पुढे जाण्याचा मार्ग सुकर होईल. दिवसातील काही वेळ तुम्ही कुटुंबातील ज्येष्ठांची सेवा करण्यात घालवाल आणि घरातील लहान मुलांसाठीही खरेदी कराल. नोकरदार लोक आणि व्यावसायिक आज मोठं यश मिळवतील. तुमच्या जोडीदारासोबतचं तुमचं नातं मजबूत राहील. मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅम बनेल.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तूळ राशीच्या लोकांच्या संपत्तीत आज वाढ होईल आणि नवीन वाहन आणि जमीन खरेदी करण्याची इच्छा देखील पूर्ण होईल. तुमच्या जोडीदारासोबत काही काळापासून सुरू असलेला वाद आज संपुष्टात येईल, त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी दिसतील. जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या करिअरबद्दल काळजी वाटत असेल तर आज तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल त्या क्षेत्रात तुम्हाला मोठं यश मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. जर तुम्ही आधी गुंतवणूक केली असेल तर आज तुम्हाला चांगला नफा मिळेल. आज तुम्ही तुमच्या घरात काही शुभ कार्यक्रमही आयोजित केले जातील. तुमचे खर्च कमी होतील आणि तुम्हाला पैसे वाचवण्यात यश मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. वृश्चिक राशीच्या लोकांची अध्यात्माची आवड आज वाढेल. आज बाप्पाच्या आशीर्वादाने घर, वाहन किंवा कार्यालय खरेदीची शक्यता राहील आणि उत्पन्नासोबत बचतही वाढेल. तुम्ही मानसिक शांती अनुभवाल. व्यावसायिकांना नशिबाची साथ मिळेल, ज्यामुळे ते व्यवसायात अधिक नफा कमावतील आणि इतर व्यवसायातही गुंतवणूक करू शकतील. नोकरदार लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी काही प्रतिष्ठित लोक भेटतील, जे पुढे त्यांना त्यांच्या करिअरमध्ये फायदेशीर ठरतील. कुटुंबातील सर्व सदस्य खूप आनंदी दिसतील, तुमच्या भावाच्या मदतीने तुमची अनेक कामं पूर्ण होतील.
धनु रास (Sagittarius)
आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी चांगला राहील. धनु राशीच्या लोकांना आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात वडील आणि गुरूच्या मदतीने यश मिळेल. तुम्ही काही कायदेशीर बाबींमध्ये अडकले असाल तर आज तुम्हाला दिलासा मिळेल आणि निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात तुम्ही सक्रिय सहभाग घ्याल, त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. जर नोकरदार लोक नोकरी बदलण्याचा विचार करत असतील तर आज तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. त्याच वेळी, व्यावसायिक योग्य नियोजनाद्वारे अधिक नफा कमावतील, ज्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास, कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल आणि तुम्हाला कुटुंबासह कुठेतरी बाहेर जाण्याची संधी मिळेल. तुम्ही अविवाहित असाल तर आज कोणीतरी खास भेटण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :