एक्स्प्लोर

Astrology : आज ब्रम्ह योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 5 राशींच्या उत्पन्नात होणार वाढ, आर्थिक स्थिती उंचावणार

Panchang 01 October 2024 : आज मंगळवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी ब्रम्ह योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 5 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology Panchang 01 October 2024 : आज मंगळवार, 1 ऑक्टोबर रोजी चंद्र कन्या राशीत जाईल. आज गुरूचा नवम पंचम योग निर्माण होईल. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी असून या दिवशी चतुर्दशी श्राद्ध केलं जाईल. आज शुक्ल योग, ब्रह्मयोग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ संयोग योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

मेष रास (Aries)

आजचा दिवस मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात नवीन उत्साह आणेल. मेष राशीचे लोक आपली अपूर्ण कामं एक एक करून पूर्ण करतील आणि भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णयही घेतील. नोकरदार वर्गाला अपेक्षित कंपनीकडून नोकरीची चांगली ऑफर मिळू शकते, यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये आणि पगारात चांगली वाढ दिसेल. व्यवसाय करणारे आज काही सकारात्मक बदल करतील, ज्यामुळे विक्रीत वाढ होईल. आज चतुर्दशी तिथीला कुटुंबात श्राद्ध केलं जाऊ शकतं, ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य नक्कीच हातभार लावतील. चांगल्या कौटुंबिक वातावरणामुळे तुम्हाला सकारात्मक वाटेल, संध्याकाळचा वेळ कुटुंबासोबत घालवण्याची संधी मिळेल.

सिंह रास (Leo)

आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी आशेचा नवीन किरण घेऊन आला आहे. सिंह राशीच्या लोकांना आज बाप्पाच्या कृपेने सर्व शत्रू आणि संकटांपासून मुक्ती मिळेल. पैसे कमवण्याचे नवे मार्ग शोधून काढल्याने तुमच्या पैशाशी संबंधित समस्या दूर होतील आणि तुम्ही चांगली बचत देखील करू शकाल. जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर आजचा दिवस अनुकूल असेल, आज तुम्ही नात्याला एक पाऊल पुढे नेऊ शकता. व्यवसाय आणि दुकानदारी करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल. जर तुम्हाला एखादी गाडी किंवा मालमत्ता खरेदी करायची असेल, तर तुम्ही या दिशेने पावलं उचलू शकता, ज्यामध्ये घरातील सर्वांचं तुम्हाला सहकार्य मिळेल. 

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. तूळ राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळाल्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. आज तुम्हाला अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय चालवत असाल तर आजचा दिवस खूप फायद्याचा असणार आहे. आज तुमचं घरातील वातावरण आनंददायी राहील. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंधही चांगले राहतील आणि तुम्ही मिळून एखाद्या मालमत्तेत गुंतवणूक देखील करू शकता, ज्यामुळे भविष्यात चांगला नफा मिळेल. आज कुटुंबातील एखादा सदस्य तुमच्यासाठी ऑनलाईन शॉपिंग देखील करू शकतो, ज्यामुळे तुम्हाला खूप बरं वाटेल आणि तुम्ही संध्याकाळ एखाद्या धार्मिक ठिकाणी घालवाल.

धनु रास (Sagittarius)

आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी विशेष फलदायी असणार आहे. धनु राशीचे लोक आज इतरांच्या मदतीला धावून जातील. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला असेल आणि तुमच्या बोलण्यातल्या गोडव्यामुळे सर्वांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील. तुमची जी कामं खूप दिवसांपासून अपूर्ण राहिली आहेत, ती पूर्ण करण्यासाठी आज तुम्हाला वेळ मिळेल. नोकरी करणाऱ्यांना आज सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल, त्यामुळे तुम्ही वेळेवर काम पूर्ण कराल आणि कामावर वातावरणही चांगलं राहील. कुटुंबात काही कलह सुरू असेल तर आज ते चर्चेतून सोडवले जातील. भावा-बहिणींमध्ये चांगले संबंध राहतील आणि त्यांचा सल्लाही तुम्हाला उपयोगी पडेल.

मीन रास (Pisces)

आजचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असणार आहे. मीन राशीचे लोक त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत संपूर्ण दिवस हसतखेळत घालवतील. तुमच्या मुलाच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी तुम्हाला आज थोडे कष्ट करावे लागतील, पण त्यात तुम्हाला यशही मिळेल. आज तुम्हाला बाप्पाच्या कृपेने अचानक मोठी रक्कम मिळू शकते, ज्यामुळे तुमची संपत्ती वाढेल. आज तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या योजना पुढे नेण्यास सक्षम असाल, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. जर तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस त्यासाठीही चांगला असेल. आज तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करण्याची संधी मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Horoscope Today 01 October 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
Embed widget