एक्स्प्लोर

Astro Tips : ऑफिसमध्ये रोज बॉसची बोलणी ऐकावी लागतायत? प्रमोशन, ट्रान्सफरमध्ये अडथळे येतायत? तर कुंडलीत 'हा' ग्रह कमजोर, उपाय पाहा

Astro Tips  जर तुम्हाला ऑफिसमध्ये तुमच्या बॉससोबत जुळत नसेल तर समजून घ्या की, तुमच्या कुंडलीतील हा ग्रह तुमच्यावर नाराज आहे

Sun Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य ग्रहाचा तुमच्या करिअरशी संबंध आहे. जेव्हा तो शुभ असते तेव्हा बॉसकडून प्रगती आणि सहकार्य मिळते. जर अशुभ असेल तर नोकरीत अडथळे येतात. त्यामुळे सूर्याला शुभच ठेवावे. नोकरीत यश किंवा अपयशात सूर्याची भूमिका महत्त्वाची मानली जाते. ज्योतिषशास्त्रीय ग्रंथांमध्ये सूर्य ग्रहाचा महिमा तपशीलवार सांगितला आहे. पदोन्नती आणि बदलीसाठी सूर्य जबाबदार मानला जात असला तरी तो वडील आणि बॉसशी संबंधित आहे. सूर्य कमजोर असेल तर नोकरीवर परिणाम होतो, बॉसमुळे ऑफिसमध्ये रोज काही ना काही अडथळे येतात. कुंडलीतील सूर्य कमजोर असेल आणि वाईट परिणाम देत असेल तर ते सहज ओळखता येते, जर तुम्ही याकडे लक्ष दिले आणि वेळीच उपाययोजना करण्यात यशस्वी झालात तर तुम्ही नोकरीतील अडचणींवर मात करू शकता.

तुमच्या कुंडलीतील 'बॉस' सूर्य आहे

जर तुम्हाला ऑफिसमध्ये तुमच्या बॉसची कृपा मिळत नसेल तर समजून घ्या की तुमच्या कुंडलीतील ग्रहांचा राजा सूर्य तुमच्यावर नाराज आहे. जन्मकुंडलीत सुर्य कमजोर असल्याने बॉससोबतचे नाते बिघडायला लागते आणि त्याचा परिणाम असा होतो की, मेहनत करूनही बॉसकडून बोलणी ऐकावी लागते. ज्योतिषशास्त्रात सूर्याला प्रभावी ग्रह मानले जाते. सूर्याला सर्व ग्रहांचा राजा म्हटले आहे. घरी वडील, ऑफिसमध्ये बॉस, जेव्हा सूर्य अशुभ असतो तेव्हा वडील आणि बॉसचे संबंधही कमजोर होऊ लागतात.

सिंह राशीचा स्वामी 'सूर्य' 

12 राशींमध्ये सूर्य सिंह राशीचा स्वामी आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्म्याचा कारक असेही म्हटले आहे. जेव्हा सूर्य शुभ असतो तेव्हा असे लोक लोकप्रिय असतात. असे लोक जिथे राहतात किंवा काम करतात तिथे त्यांच्या कामावरून ओळखले जातात. अशा लोकांचे म्हणणे प्रत्येकजण गांभीर्याने ऐकतो आणि त्याची अंमलबजावणीही करतो.

सूर्य अशुभ आहे की नाही हे कसे ओळखावे?

कुंडलीत सूर्य अशुभ परिणाम देत आहे की नाही हे कसे जाणून घ्याल? सूर्याची अशुभ स्थिती वेळीच समजून घेतली तर होणारे नुकसान टाळता येते. जेव्हा सूर्य अशुभ असतो तेव्हा या समस्या जाणवू लागतात-

वडिलांशी संबंध बिघडतात.
ऑफिसमध्ये बॉसच्या नाराजीला सामोरे जावे लागते.
एखाद्याला आत्मविश्वासाची कमतरता जाणवू लागते.
डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवू लागतात.
जेवणात मीठाची कमतरता जाणवू लागते.
थुंकी तोंडात राहते.
शरीरात जडपणा जाणवतो.
घरातील विद्युत उपकरणे खराब होऊ लागतात, विशेषत: बल्ब इ.
तांब्यापासून बनवलेल्या वस्तू नष्ट होऊ लागतात.
भर उन्हात फिरावे लागते किंवा राहावे लागते.


कुंडलीत सूर्याची स्थिती

कुंडलीत सूर्य कमजोर असणे चांगले मानले जात नाही. कारण त्याचा आत्मा आणि हृदयाशीही संबंध असल्याचे मानले जाते. प्रत्येकाला माहित आहे की कोणतेही काम करण्यासाठी आत्मविश्वास असणे आवश्यक आहे. आत्मविश्वासाचा अभाव असेल तर कामात यश मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. यासोबतच ज्योतिषशास्त्रात सूर्याला राजा मानले जाते. सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा आहे. यासोबतच सूर्य हा बदल आणि शासनाचा कारक मानला गेला आहे. काही ज्योतिषांनी पिता आणि बॉसला सूर्याचे कारक मानले आहे. प्रमोशन किंवा ट्रान्सफरमध्ये अडचण येत असेल आणि ऑफिसमध्येही तुम्हाला तुमच्या बॉसकडून सहकार्य मिळत नसेल, तर कुंडलीत सूर्याची स्थिती कुठेतरी कमकुवत आहे, असे समजावे. त्यामुळे त्यावर वेळीच उपाय करायला हवा. ऑफिसमध्ये तुमच्या बॉसकडून तुम्हाला वारंवार फटकारले जात असले तरीही तुम्ही सूर्य उपाय अवश्य करून पहा.


सूर्य शुभ होण्यासाठी हे उपाय करावेत

रविवारी सूर्याला जल अर्पण करा.
गायत्री मंत्राचा जप करा.
वडिलांची सेवा करा.
बॉसवर टीका करू नका.
नियम पाळा.
लाल वस्त्र दान करा.
पाण्यात लाल चंदन मिसळून ते सूर्यदेवाला अर्पण करावे.


या गोष्टीही लक्षात ठेवा

रविवार हा सूर्य देवाला समर्पित आहे. या दिवशी सूर्याला सकाळी उठून पूजा करावी. यासोबतच वडिलांच्या आदेशाचे पालन करावे. सूर्य हा शिस्तप्रिय ग्रह आहे. त्यामुळे कार्यालयीन नियमांचे पालन करावे आणि बॉसवर टीका करू नये. तुम्ही गूळ आणि तूप दान करू शकता. दर महिन्याला येणाऱ्या संक्रांतीच्या दिवशी दानधर्म करावा. एखाद्याने रागावणे आणि दुस-याला वाईट बोलणे टाळले पाहिजे. हे उपाय केल्यास सूर्याचे अशुभ बरेच अंशी कमी होते.

 

(टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Shani Dev : 2024 मध्ये 'या' 4 राशींना शनिदेव करतील मालामाल! त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत? जाणून घ्या 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget