Aries Horoscope Today 5 May 2023 : मेष राशीची आर्थिक स्थिती चांगली, पण कौटुंबिक वातारणात तणाव राहील; आजचा दिवस संमिश्र
Aries Horoscope Today 5 May 2023 : आज तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. पोटाशी संबंधित काही समस्या असू शकतात.
Aries Horoscope Today 5 May 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आणि फलदायी आहे. आज नोकरीत (Job) अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. जे बेरोजगार आहेत, त्यांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. तुम्हाला मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसाय (Business) करणारे लोक आपला व्यवसाय वाढवण्यात व्यस्त राहतील. कामाचा ताण जास्त असेल, त्यामुळे थकवा जाणवेल. यासाठी थोडा वेळ स्वत:साठी काढून विश्रांती घ्या. तुम्हाला बरं वाटेल. बदलत्या हवामानामुळे आरोग्यात चढ-उतार दिसून येतील. तुमची व्यावसायिक स्थिती मध्यम राहील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी काही वस्तू खरेदी करा. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर प्रेमळ क्षण घालवा.
मेष राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी संतुलन राखावे लागेल. कामाचा ताण जास्त राहील परंतु मेहनतीनुसार लाभ न मिळाल्याने निराश व्हाल. विरोधक आणि प्रतिस्पर्धी तुमच्या कामात अडथळा आणू शकतात, सतर्क राहा. आर्थिक बाबींमध्ये दिवस खर्चिक असेल, परंतु धार्मिक कार्य आणि खाण्यापिण्याशी संबंधित काम केल्यास दिवस लाभदायक राहील. कपडे आणि दागिन्यांच्या व्यापाऱ्यांनाही चांगली कमाई करता येईल.
आज मेष राशीचे कौटुंबिक जीवन
आजचा दिवस कुटुंबात संमिश्र जाईल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल परंतु नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तीमुळे मानसिक तणावाखाली राहाल. मुलांशी संबंधित समस्यांबाबतही काही समस्या असू शकतात. विरोधकांपासून सावध राहावे लागेल.
आज मेष राशीचे आरोग्य
आज तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. पोटाशी संबंधित काही समस्या असू शकतात. खाण्यापिण्यात संयम ठेवा. जास्त विचार करू नका यामुळे आरोग्यावर आणखी वाईट परिणाम होतील.
मेष राशीसाठी आजचे उपाय
भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करा, चंद्राला दूध अर्पण करा. मंदिरात पांढरे धान्य दान करा.
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :