(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aquarius Monthly Horoscope March 2023: आरोग्य आणि करिअरच्या दृष्टीने आव्हानात्मक काळ, महिन्याच्या अखेरीस संबंध सुधारतील, मासिक राशीभविष्य
Aquarius Monthly Horoscope March 2023: कुंभ राशीच्या लोकांसाठी मार्च महिना संमिश्र जाईल. तब्येत थोडी बिघडलेली राहू शकते, तणाव टाळण्यासाठी चांगल्या संगीताचा आधार घ्या. मासिक राशीभविष्य जाणून घ्या
Aquarius Monthly Horoscope March 2023 : कुंभ राशीचा स्वामी शनि आहे. या राशीच्या लोकांना संशोधन करण्यात जास्त रस असतो. त्यांचे मित्र खूप मर्यादित असतात. या महिन्यात कुंभ राशीच्या लोकांना करिअर, पैसा, कौटुंबिक आणि आरोग्याच्या बाबतीत संमिश्र परिणामांचा सामना करावा लागू शकतो. शनि स्वतःच्या चंद्र राशीत असल्यामुळे या महिन्यात प्रमुख ग्रहांची स्थिती चांगली दिसत नाही. यामुळे या महिन्याच्या तिमाहीपर्यंत या लोकांना काही चांगले परिणाम दिसतील, परंतु पंधरा तारखेनंतर सकारात्मक परिणामांची अपेक्षा दिसत नाही. गुरू हा एकमेव ग्रह आहे, जो या राशीच्या लोकांना या महिन्यात लाभ देईल, याचे कारण गुरु ग्रह दुसऱ्या घरात राहणार आहे. मासिक राशीभविष्य जाणून घ्या
करिअरसाठी आव्हानात्मक काळ
कुंभ राशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टीने हा काळ आव्हानात्मक असेल. तुम्हाला टप्प्याटप्प्याने जावे लागेल आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. शनि स्वतःच्या राशीत पहिल्या घरात असेल, त्यामुळे या लोकांचे जीवन आव्हानात्मक असेल. पहिल्या भावात शनि स्वतःच्या राशीत असल्यामुळे, असेल त्या नोकरीत समाधान मानून अधिक आव्हानांना तोंड देण्यासाठी वचनबद्ध असतील. या महिन्यात लोकांना त्यांच्या कामाची पुरेशी ओळख न मिळण्याची शक्यता आहे. जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांना कदाचित जास्त नफा मिळत नाही आणि त्याबाबत त्यांच्या अपेक्षा सहज शक्य होणार नाहीत.
आर्थिक जीवन कसे असेल?
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक जीवनाच्या दृष्टीने कठीण जाईल. शनि आणि केतू सारखे ग्रह अनुकूल स्थितीत नसल्याने महिन्याचा पूर्वार्ध चांगला नसेल, यामुळे धन भाग्याबाबत प्रश्नचिन्ह वाटू शकते. चंद्र राशीच्या संदर्भात दुसऱ्या भावात बृहस्पति असल्याने अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर पैसे वाचविण्यास सक्षम ठराल. मार्च 2023 च्या मासिक राशीभविष्यानुसार, जे लोक व्यवसाय करत आहेत. त्यांना महिन्याचा शेवट अनुकूल वाटू शकतो. कारण सर्व काही त्यांच्या बाजूने होईल. या लोकांना मोठा नफाही मिळू शकतो.
पाठदुखी सारखी समस्या होऊ शकते
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आरोग्याच्या दृष्टीने चांगला नाही. महिन्याच्या पूर्वार्धात पहिल्या भावात शनि असल्यामुळे काही तणाव आणि पाठदुखी संबंधित समस्या उद्भवू शकतात. या लोकांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता आणि चिंता असू शकते. बृहस्पती द्वितीय घरामध्ये अनुकूल स्थितीत आहे, त्यामुळे या राशीच्या व्यक्ती आरोग्याच्या समस्यांमुळे त्रस्त असू शकतात. यासोबतच चंद्र राशीतून तिसऱ्या घरात राहुची स्थिती आरोग्यासाठी चांगले परिणाम देऊ शकते.
प्रेमसंबंध कसे असतील?
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रेम आणि वैवाहिक जीवनाच्या बाबतीत भाग्यवान नाही. शनिसारखा प्रमुख ग्रह पहिल्या भावात असल्याने प्रेमात वाद होऊ शकतात. यासोबतच ज्या लोकांचे लग्न झाले नाही त्यांना लग्नात विलंबाचा सामना करावा लागू शकतो. विवाहितांना या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत वैवाहिक जीवनात सामंजस्याचा अभाव जाणवू शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या
Cancer Monthly Horoscope March 2023: कर्क राशीच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल, मार्च महिन्याचे राशीभविष्य