(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cancer Monthly Horoscope March 2023: कर्क राशीच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल, मार्च महिन्याचे राशीभविष्य
Cancer Monthly Horoscope March 2023: या महिन्यात तुम्हाला तुमच्या व्यावसायिक संबंधांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जाणून घ्या मार्च 2023 चे मासिक राशिभविष्य
Cancer Monthly Horoscope March 2023 : मार्च 2023 सुरू होत आहे. वर्षाच्या तिसर्या महिन्यात, लोक यश, सुखी जीवनाच्या अपेक्षेने पाहात आहेत. या महिन्यातील राशीच्या लोकांचे मासिक राशीभविष्य कसे असेल? कर्क चौथी राशी आहे आणि तिचा स्वामी चंद्र आहे. या राशीत जन्मलेले लोक चांगले विचार करणारे असतात. त्यांच्यात उच्च विचार करण्याची शक्ती आहे. त्यांना खूप प्रवास करायला आवडते. स्वभावाबद्दल बोलायचे तर हे लोक मुक्त विचारसरणीचे असतात. जाणून घ्या मार्च 2023 चे मासिक राशिभविष्य
कार्यक्षेत्र - मासिक राशिभविष्य
या महिन्यात तुम्हाला तुमच्या व्यावसायिक संबंधांकडे लक्ष देणे आवश्यक आहे, अन्यथा परिणाम अनुकूल होणार नाहीत. पैसा कुठेतरी गुंतवला तर तिथून नफा तर मिळतोच, पण त्या तुलनेत खर्चही वाढतो. या महिन्यात अडकलेला पैसाही परत येऊ शकतो. तुम्ही एखादे काम केल्यास वरिष्ठ तुमच्या कामावर खूश होतील आणि महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात एखादा नवीन प्रकल्प हाती घेता येईल. या प्रकल्पावर तुम्ही योग्य पद्धतीने काम केल्यास तुमच्या भविष्यातील प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. नोकरदार वर्ग स्वत:साठी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतील.
आर्थिक- मासिक राशिभविष्य
या मिथुन राशीच्या लोकांसाठी मंगळाची स्थिती अनुकूल नसल्याने महिन्याच्या सुरुवातीला जास्त खर्चाच्या स्वरुपात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. तुमच्या चंद्र राशीत पहिल्या घरात मंगळ असल्यामुळे तुम्हाला अनावश्यक खर्चाचा सामना करावा लागू शकतो.
आरोग्य - मासिक राशिभविष्य
मिथुन राशीचे आरोग्य पाहता पायात सूज येण्याची समस्या असू शकते. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला या समस्येने अधिक त्रास होईल. तुम्ही अधिक शारीरिक काम करत असाल तर प्रामुख्याने तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, अन्यथा तुम्हाला दुखापत होऊ शकते. मूळव्याध रुग्णांनी डॉक्टरांच्या संपर्कात राहावे.
प्रेम आणि लग्न - मासिक राशिभविष्य
प्रेम जीवनासाठी हा महिना थोडा संवेदनशील असेल. जर तुम्ही एखाद्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असाल तर ते त्यांच्यासोबत कायम ठेवा, नाहीतर एखाद्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे. काही गोष्टींबद्दल पार्टनर तुमच्यावर निराश होऊ शकतात, त्यामुळे त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा.
कौटुंबिक जीवन - मासिक राशिभविष्य
जर घराची आर्थिक स्थिती बिघडत असेल आणि तुम्ही कष्टही करत असाल तर कोणाची तरी वाईट नजर तुमच्यावर आहे असे दिसते. हे टाळण्यासाठी एकतर ज्योतिषशास्त्राचा आधार घ्या किंवा इतर काही उपाय करा. या महिन्यात तुम्ही तुमच्या शत्रूंपासून दूर राहा आणि त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचे भांडण किंवा वादात पडणे टाळा.
उपाय
दररोज 108 वेळा ओम बुधाय नमः चा जप करा.
विष्णु सहस्रनामाचा रोज जप करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या
Taurus Monthly Horoscope March 2023: वृषभ राशीच्या लोक करिअरमध्ये चांगली कामगिरी करतील, मार्च राशीभविष्य