एक्स्प्लोर

Angarki Chaturthi 2024 : आज अंगारकीला जुळून आले अनेक शुभ योग; 'या' 5 राशींना मिळणार कष्टाचं फळ, रखडलेली कामंही होणार पूर्ण

Panchang 25 June 2024 : आज मंगळवार, अंगारक संकष्टी चतुर्थी. आजचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, याचा 4 राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे. मेषसह 4 राशींवर आज बाप्पांची विशेष कृपा राहील, आजचा दिवस लाभाचा असेल. आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology 25 June 2024 : ग्रहांच्या स्थितीनुसार, आजच्या दिवसांचं महत्त्व वाढलं आहे. आज मंगळवार, 25 जून रोजी चंद्र कुंभ राशीत असणार आहे आणि चंद्रातून शनि दुसऱ्या भावात प्रवेश करत आहे, त्यामुळे सनफ योग तयार होत आहे. तसेच आज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी असून या तिथीला अंगारकी संकष्टी चतुर्थी तिथीचा उपवास केला जातो. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या तिथीला लक्ष्मी नारायण योग, त्रिग्रही योग, सनफ योग आणि श्रवण नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा लाभ मिळेल. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

मेष रास (Aries)

आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. मेष राशीच्या लोकांना आज सकाळपासून उत्साही वाटेल, आज ते कामात व्यस्त राहतील आणि त्यांचं आरोग्यही चांगलं राहील. आज बाप्पाच्या कृपेने तुमची अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकेल. नोकरदार लोकांना करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी मिळतील आणि त्यांचा नवीन नोकरीचा शोधही पूर्ण होऊ शकेल. व्यवसाय करणाऱ्यांना आज जास्त नफा मिळेल. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास, कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांना साथ देतील. वैवाहिक जीवनाविषयी बोलायचं तर, तुमच्या जोडीदारासोबत काही मतभेद असतील तर ते संपुष्टात येतील.

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. सिंह राशीच्या लोकांना त्यांचा अडकलेला पैसा आज परत मिळेल आणि त्यांना धार्मिक कार्यात रस राहील. तुमच्या मुलांच्या लग्नासाठी तुम्हाला चांगले प्रस्ताव मिळतील. नोकरीतील लोकांना आज सहकारी आणि अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल, त्यामुळे सर्व कामं सहज पूर्ण होतील. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजचा दिवस शुभ असेल. आज तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात तुम्हाला चांगला नफा मिळेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही मालमत्ता खरेदी करू शकता आणि मुलांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करू शकता.

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. आज तुमचं आरोग्य चांगलं राहील. नशिबाच्या साथीने तुमची सर्व कामं सहज पूर्ण होतील आणि सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. कुठूनतरी पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा बँक बॅलन्स वाढेल. नोकरदार लोकांच्या कामाचं आज अधिकाऱ्यांकडून कौतुक होईल. सरकारी-अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध अधिक दृढ होतील, ज्यामुळे भविष्यात तुमची अनेक कामं पूर्ण होण्यास मदत होईल. तुम्ही जमीन किंवा फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. 

धनु रास (Sagittarius)

आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असणार आहे. धनु राशीचे लोक आज अचानक मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाऊ शकतात. आज ते त्यांच्या प्रत्येक कामात पूर्णपणे सतर्क राहतील. अचानक तुम्हाला कुठूनतरी अडकलेले पैसे मिळू शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुमचं मनही प्रसन्न राहील.  जर तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून पैसे घेतले असतील तर त्या व्यक्तीला तुम्ही पूर्ण परतफेड कराल. नोकरी आणि व्यवसायात आज चांगला नफा होईल आणि करिअरमध्येही चांगली प्रगती होईल. तुमच्या भावाच्या मदतीने तुमची अनेक घरगुती कामं पूर्ण होतील आणि काही महत्त्वाच्या विषयांवर कुटुंबात चर्चा होऊ शकते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Angarki Sankashti Chaturthi 2024: मंगळ दोष दूर करण्यासाठी आज अंगारकी चतुर्थीला करा 'हे' उपाय; लवकरच वाजतील सनई चौघडे

Horoscope Today 25 June 2024 : आज अंगारकी संकष्टी चतुर्थी! हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Vs Yashomati Thakur | नवनीत राणांकडून यशोमती ठाकूर यांचा नणंदबाई असा उल्लेखTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07.30 PMABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7 PM 07 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07 Nov ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
Embed widget