Angarki Sankashti Chaturthi 2024: मंगळ दोष दूर करण्यासाठी आज अंगारकी चतुर्थीला करा 'हे' उपाय; लवकरच वाजतील सनई चौघडे
Mangal Dosh Upay : ज्योतिषांच्या मते, मंगल दोषाने पीडित व्यक्तीला विवाहात अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक प्रकरणांमध्ये लग्न ठरल्यानंतरही तुटतं. याशिवाय काही वेळा लग्नानंतर वैवाहिक जीवनात अडथळे येतात, यासाठी मंगल दोष दूर करणं आवश्यक आहे. तो कसा? जाणून घेऊया.
Angarki Sankashti Chaturthi 2024 Remedies : ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी गणपती बाप्पाला (Ganpati Bappa) समर्पित आहे. या दिवशी अंगारक संकष्टी चतुर्थी (Angarak Sankashti Chaturthi 2024) साजरी केली जाते. यावेळी गणेशाची पूजा केली जाते. तसेच शुभ कार्यात यश मिळवण्यासाठी संकष्टी चतुर्थीचं व्रत पाळलं जातं. हे व्रत केल्याने साधकाला अपेक्षित फल प्राप्त होतं. चतुर्थी तिथीचे परिणाम चतुर्थीच्या काही दिवसांनी मिळतात.
मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हणतात. अंगारकी चतुर्थीचं व्रत केल्याने मंगळ दोष नाहीसा होतो. तसेच सर्व प्रलंबित कामं वेगाने होतात. जर तुम्हालाही मंगळ दोषाचा त्रास होत असेल तर अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची यथोचित पूजा करा. तसेच पूजा करताना खालील उपाय करा, हे उपाय केल्याने मंगळ दोष दूर होतो.
मंगळ दोष दूर करण्यासाठी अंगारक चतुर्थीला करा हे उपाय (Angarak Sankashti Chaturthi 2024 Remedies)
- जर तुम्हाला मंगळ दोषाचा त्रास होत असेल तर मंगळवारी येणाऱ्या चतुर्थींचं व्रत सुरू करा, तसेच गणेशाची पूजा करावी. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने मंगळ दोष दूर होतो.
- अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व प्रकारची दुःखं आणि संकटं दूर होतात. यासोबतच मंगळ दोषाचा प्रभावही संपतो.
- श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी अंगारकी चतुर्थीला विधीनुसार गणेशाची पूजा करावी. यावेळी गणेशाला दुर्वा, मोदक, लाडू, सुपारी इत्यादी वस्तू अर्पण करा.
- मंगळ दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अंगारकी चतुर्थीला बाप्पाला सिंदूर अर्पण करा. श्रीगणेशाला सिंदूर अर्पण केल्याने साधकाला अपेक्षित फळ मिळतं.
- मंगळ दोष दूर करण्यासाठी अंगारकी चतुर्थी तिथीला मसूर डाळ, मूग, मध, हिरवे कपडे, हिरव्या भाज्या इत्यादी गोष्टींचं दान करा. हा उपाय केल्यानेही श्रीगणेश प्रसन्न होतात.
अंगारकीला चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभराच्या चतुर्थीचे पुण्य मिळते (Angarki Chaturthi Importance)
चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पाची सर्वात आवडती तिथी आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जातो. मनोभावे हे व्रत केल्यास बाप्पा आपल्य सर्व मनोकामना पूर्ण करतात. पुजा करताना लाल वस्त्र परिधान करावे. आवडते मोदक अर्पण करावा. अंगारकी चतुर्थीला चुकूनही तुळस तुळस अर्पण करु नये. अंगारकीला चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभराच्या चतुर्थीचे पुण्य मिळते, अशी धारणा आहे. बाप्पा सुख देतात आणि आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करतात. चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पुजा केली पाहिजे. चतुर्थीला मोदक, दुर्वा, लाल जास्वंद अर्पण करावे, त्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :