Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला तुमचं नशीब चमकेल! कुबेराच्या कृपेने तिजोरी भरेल, फक्त संध्याकाळी 'हे' उपाय करा, फार कमी लोकांना माहीत
Akshaya Tritiya 2025: असे मानले जाते की, जर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी योग्य उपाय केले तर कर्म, नशीब आणि संपत्तीचे दरवाजे उघडतात. कोणते असे उपाय कराल? जे फायदेशीर ठरेल? जाणून घेऊया..

Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेचा सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. हा केवळ सोने-चांदी खरेदी करण्याचा दिवस नाही तर तो आध्यात्मिक प्रगती आणि समृद्धी मिळविण्याची संधी देखील आहे. असे मानले जाते की जर या दिवशी योग्य उपाय केले तर कर्म, नशीब आणि संपत्तीचे दरवाजे उघडतात. शास्त्रानुसार, कोणते असे उपाय कराल? जे फायदेशीर ठरेल ते जाणून घेऊया..
देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि भाग्य चमकते.
यंदा अक्षय्य तृतीया 30 एप्रिल 2025 रोजी साजरी केली जाईल. हिंदू कॅलेंडरनुसार, ही तारीख वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला येते. अक्षय्य तृतीया ही संपत्ती, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक मानली जाते. संस्कृतमध्ये "अक्षय्य" चा अर्थ आहे - जे कधीही संपत नाही. या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अनंत फळे देते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने-चांदी खरेदी करण्याबरोबरच दिवे लावण्याचेही विशेष महत्त्व आहे. या दिवशी संध्याकाळी विशेष ठिकाणी दिवे लावले तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि भाग्य चमकते. या दिवशी कोणत्या 4 ठिकाणी दिवे लावल्याने घरात सुख, समृद्धी आणि संपत्ती येते हे जाणून घेऊया.
उत्तर दिशेला दिवा लावा.
घराची उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर आणि देवी लक्ष्मीचे स्थान मानली जाते. या दिशेला दिवा लावल्याने धन आणि समृद्धी वाढते आणि घरात सुख-शांती टिकून राहते. संध्याकाळी, उत्तरेकडे तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा नक्कीच लावा.
पाणी साठवण्याच्या ठिकाणी दिवा लावा.
स्वयंपाकघरातील पिण्याचे पाणी साठवण्याची जागा पूर्वजांचे स्थान मानले जाते. अक्षय्य तृतीयेला तिथे दिवा लावणे म्हणजे पूर्वजांना आदरांजली वाहण्यासारखे आहे. यामुळे पूर्वजांचे आशीर्वाद अबाधित राहतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही.
तुमच्या घराजवळील पाण्याच्या स्रोतावर दिवा लावा.
जर तुमच्या घराजवळ विहीर, तलाव किंवा नदी असेल तर तिथे जा आणि दिवा लावा. जलस्त्रोतांवर दिवे लावल्याने देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाहते.
मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला दिवे लावा.
संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावा. देवी लक्ष्मीला आकर्षित करण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो. यामुळे घरात धन आणि समृद्धी येते आणि गरिबी दूर होते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.)




















