12 April Shubh Yog : 12 एप्रिलचा दिवस अद्भूत! हनुमान जयंतीसह जुळून येणार 'पंचग्रही योग'; 'या' 3 राशींच्या घरी होणार पैशांचा लखलखाट
12 April Shubh Yog : ज्योतिष शास्त्रानुसार, 12 एप्रिल रोजी पंचग्रही योग निर्माण होणार आहे. या दिवशी मीन राशीत सूर्य, बुध, शुक्र, शनि आणि राहूचा संयोग जुळून येणार आहे.

12 April Shubh Yog : हिंदू पंचांगानुसार, 12 एप्रिल म्हणजेच शनिवारचा दिवस हा फार महत्त्वाचा असणार आहे. कारण या दिवशी हनुमान जयंती (Hanuman Jayanti) असणार आहे. त्याचबरोबर 5 शक्तिशाली ग्रह जुळून येणार आहेत. त्यामुळे दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
खरंतर, 12 एप्रिल रोजी पंचग्रही योग निर्माण होणार आहे. या दिवशी मीन राशीत सूर्य, बुध, शुक्र, शनि आणि राहूचा संयोग जुळून येणार आहे. यामुळे पंचग्रही योग जुळून आला आहे. हा योग फार दुर्मिळ योग मानला जातो.
शनिवारच्या दिवशी पौर्णिमा तिथी असणार आहे. या दिवशी संध्याकाळी 06.08 वाजता हस्त नक्षत्र आणि नंतर चित्रा नक्षत्र असणार आहे. या ठिकाणी वाशि योग, आनंदादी योग, सुनफा योग, बुधादित्य योग आणि व्याघात योग जुळून येणार आहेत.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी हनुमान जयंतीचा दिवस फार शुभ असणार आहे. या दिवशी पंचग्रही योग जुळून येणार आहे. यामुळे या राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. नोकरी करणाऱ्या लोकांना या काळात चांगला लाभ मिळेल. तसेच, अनेक दिवसांपासून तुमच्या व्यवसायात जो तोटा होत होता तो तुम्हाला आता मिळणार नाही.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी पंचग्रही योग फार लाभदायक ठरणार आहे. या काळात मुलांना अभ्यासाशी संबंधित कोणती अडचण येणार नाही. तसेच, प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. लवकरच तुमच्या घरी आनंदाची बातमी मिळणार आहे.
मीन रास (Pisces Horoscope)
12 एप्रिलचा दिवस मीन राशीसाठी देखील फार खास असणार आहे. या दिवशी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तसेच, भगवान हनुमान तुमची सर्व संकटांपासून सुटका करेल. तुमच्या उत्पन्नात वाढ झालेली दिसेल. तसेच, जोडीदाराबरोबर तुमचा संवाद चांगला असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:















