Onion Export : निर्यात बंदी उठवल्याने कांदा उत्पादकांसह व्यापाऱ्यांना दिलासा, कांद्यावरील संपूर्ण निर्यात बंदी खुली करण्याची मागणी
Onion Export Ban Lift : अखेर दोन महिन्यानंतर कांदा निर्यात बंदी उठवल्याने कांदा उत्पादकांसह व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
Onion Export : केंद्र सरकारने अखेर कांद्यावरी निर्यात बंदी (Onion Export) उठवत शेतकरी आणि व्यापऱ्यांना दिलासा दिला आहे. डिसेंबर महिन्यात कांद्याचे बाजार भाव 4 हजार रुपयांवर गेल्याने बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्यात बंदी उठवण्याची मागणी करण्यात येत होती. केंद्र सरकारने 7 डिसेंबर रोजी कांद्याची निर्यात बंदी (Onion Export Ban Lift) केल्यानंतर कांद्याचे बाजार भाव 800 ते 1000 रुपये पर्यंत कोसळल्याने कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी यासाठी व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनी जोरदार मागणी केली होती. अखेर सव्वा दोन महिन्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना दिलासा देत, तीन लाख मॅट्रिक टनापर्यंत कांदा निर्यातीला परवानगी दिली असून बांगलादेश येथे पन्नास हजार मॅट्रिक टन तर इतर देशांमध्ये अडीच लाख मॅट्रिक टन कांदा निर्यात करता येईल अशी घोषणा केली.
अखेर दोन महिन्यानंतर कांदा निर्यात बंदी उठवली
दरम्यान, औषधी म्हणून समजला जाणारा सफेद कांदा आणि रोजच्या आहारात लागणारा लाल कांदा आणि कोणत्या राज्यातून किती कांदा निर्यात केला जाणार याबाबत आदेश न निघाल्यामुळे मात्र अस्पष्टता आहे. निर्यातबंदी खुली केल्याने कांद्याचे आज काय बाजार भाव निघता याकडे शेतकऱ्यांच्या लक्ष लागलं आहे. तातडीने कांदा निर्यात बंदी खुली करत आदेश काढावा आणि संपूर्ण कांद्याची निर्यात बंदी खुली करावी अशी मागणी शेतकऱ्यांचे व्यापारी करत आहे.
संपूर्ण कांद्याची निर्यात बंदी खुली करण्याची मागणी
जागतिक लेव्हल आणि आखाती देशाच्या दबावामुळे निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय केंद्र सरकारला घ्यावा लागला असून शेतकऱ्यांनी मागणी केली त्यावेळी जर निर्णय घेतला असता तर शेतकऱ्यांना फायदा झाला असता अशी प्रतिक्रिया मुंबई बाजार समिती संचालक तथा कांदा तज्ञ जयदत्त होळकर यांनी दिली आहे. केंद्राने 3 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला वास्तविक पाहता हा 3 लाख मेट्रिक टन हे कमी आहेत. जास्तीत जास्त कांदा हा देशाबाहेर गेला पाहिजे, जेणेकरून कांद्याचे भाव स्थिर होवून शेतकऱ्यांचा लागवडीचा आणि इतर खर्च फिटून दिलासा मिळेल म्हणून यावर केंद्राने लवकरात लवकर निर्णय घ्यावा.
हळूहळू कांदा निर्यातीवरील निर्बंध कमी होणार
भारताने पुन्हा एकदा कांद्याची निर्यात सुरू करण्याचा विचार केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, देशांतर्गत बाजारात नवीन पिकांची उपलब्धता सुधारल्यानंतर आणि किंमती कमी झाल्यानंतर सरकार हळूहळू निर्यातीवरील निर्बंध कमी करत आहे. सरकारने बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ आणि भूतानमध्ये कांदा निर्यात करण्यास मान्यता दिली आहे. याशिवाय मॉरिशस आणि बहरीनलाही कांदा निर्यातीत सूट मिळाली आहे.
भारत कांद्याचा जगातील दुसरा मोठा निर्यातदार
भारतातून जगभरात कांद्याची निर्यात केली जाते. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कांदा निर्यात करणारा देश आहे. कांदा जवळजवळ प्रत्येक देशात लोकांच्या स्वयंपाकघरात वापरला जातो. यासोबतच कांद्याच्या दरातील चढ-उताराचा थेट परिणाम महागाईच्या आकडेवारीवर आणि सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. जगातील अनेक देश कांद्याच्या पुरवठ्यासाठी पूर्णपणे भारतावर अवलंबून आहेत. यामध्ये बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान, मॉरिशस आणि बहरीन या शेजारील देशांचाही समावेश आहे. यासोबतच भारतीय शेतकरी इतर अनेक देशांमध्ये कांद्याची निर्यात करतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मोठी बातमी! अखेर कांद्यावरील निर्यातबंदी उठवली, केंद्र सरकाचा मोठा निर्णय