Innovative Agriculture Workshop : नीती आयोगाची 'नाविन्यपूर्ण शेती' विषयावर कार्यशाळा, कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर राहणार उपस्थित
ती आयोगाकडून 'नाविन्यपूर्ण शेती' (इनोव्हेटिव्ह ॲग्रीकल्चर) या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. उद्या म्हणजे 25 एप्रिलला ही कार्यशाळा होणार आहे.
Innovative Agriculture Workshop : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून, नीती आयोगाकडून 'नाविन्यपूर्ण शेती' (इनोव्हेटिव्ह ॲग्रीकल्चर) या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. उद्या म्हणजे 25 एप्रिलला ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेला केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि पुरषोत्तम रुपाला, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, सदस्य (कृषी) डॉ. रमेश चंद आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत हे संबोधित करणार आहेत.
दरम्यान, उद्या होणारी कार्यशाळा भारत आणि परदेशातील नाविन्यपूर्ण शेती आणि नैसर्गिक शेती पद्धतींच्या क्षेत्रात काम करणाऱ्या हितसंबंधितांना एकत्र आणेल अशी अपेक्षा आहे. नैसर्गिक शेतीचे संवर्धन करणे, मातीचे आरोग्य पुनर्संचयित करणे, त्याची भूमिका अधोरेखित करणे आणि हवामान बदल कमी करणे या प्रमुख विषयांवर या कार्यशाळेत चर्चा केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. नैसर्गिक शेती पद्धती मुख्यतः अन्न आणि कृषी संघटना (FAO) द्वारे पुरस्कृत केलेल्या कृषी पर्यावरणाच्या तत्त्वांशी सुसंगत आहे. ही पद्धत रासायनिक शेतीचा पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करत शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी व्यवहार्य उपाय करायला सांगते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध प्रसंगी नैसर्गिक शेतीच्या महत्त्वावर भर दिला आहे. 16 डिसेंबर 2021 रोजी नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय परिषदेदरम्यान, पंतप्रधनांनी नैसर्गिक शेती ही जनचळवळीत रुपांतरित व्हावी, असे आवाहन केले होते. 2022-23 च्या अर्थसंकल्पातही संपूर्ण देशभरात रसायन मुक्त नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याची घोषणा केली आहे. ज्याची सुरुवात गंगा नदीच्या 5 किमी रुंद प्रट्ट्यातील शेतापासून झाली आहे. सध्या शेती क्षेत्रात नवनवीन बदल होत आहेत. देशातील शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत आहेत. हे करत असताना शेतकऱ्यांनी मातीचे आरोग्य नेमकं कसे जपावे, नैसर्गीक शेतीचे संवर्धन कसे करावे यासंदर्भात चर्चा होणार आहे. तसेच परदेशात शेती क्षेत्रात कोणकोणते बदल होत आहेत. त्यादृष्टीने आपल्या देशात काही करता येईल का या संदर्भात देखील या कार्यशाळेत चर्चा होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: