गहू उत्पादकांसाठी अच्छे दिन! इजिप्तकडून भारताला गहू पुरवठादार म्हणून मान्यता
Egypt approves India as wheat supplier : भारतातून 1 दशलक्ष टन गहू आयात करण्याचा विचार आफ्रिकन राष्ट्रांनी केला असून आणि एप्रिलमध्ये 2,40,000 टन गहू लागण्याचा अंदाज आहे.
Egypt approves India as wheat supplier : युक्रेन आणि रशियाकडून गव्हाच्या सर्वात मोठ्या आयातदारांपैकी एक असलेल्या इजिप्तने भारताला गहू पुरवठादार म्हणून मान्यता दिली आहे अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत गव्हाच्या उपलब्धतेत मोठी घट झाली आहे. दोन्ही राष्ट्रे गव्हाचे प्रमुख उत्पादक आणि निर्यातदार आहेत.
इजिप्तने 2020 मध्ये रशियाकडून USD 1.8 अब्ज आणि युक्रेनमधून USD 610.8 दशलक्ष किमतीचा गहू आयात केला होता. तर भारतातून 1 दशलक्ष टन गहू आयात करण्याचा विचार आफ्रिकन राष्ट्रांनी केला असून आणि एप्रिलमध्ये 2,40,000 टन गहू लागण्याचा अंदाज आहे.
भारतीय शेतकरी जगाला अन्न पुरवतो आहेत. इजिप्तने भारताला गहू पुरवठादार म्हणून मान्यता दिली आहे. स्थिर अन्न पुरवठ्यासाठी जग विश्वसनीय पर्यायी स्रोताच्या शोधत असतानाच मोदी सरकार हे पाऊल टाकत आहे. आमच्या शेतकऱ्यांनी धान्यसाठ्याची खात्री करून दिली असून आम्ही जगाची सेवा करण्यास तयार आहोत, असे गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
भारताची गहू निर्यात एप्रिल-जानेवारी 2021-22 मध्ये USD 1.74 अब्ज पर्यंत वाढली आहे जी मागील वर्षी याच कालावधीत USD 340.17 दशलक्ष होती. 2019-20 मध्ये, गव्हाची निर्यात USD 61.84 दशलक्ष होती, जी 2020-21 मध्ये USD 549.67 दशलक्ष झाली.
२०२०-२१ मध्ये भारताची गहू निर्यात प्रामुख्याने शेजारील देशांना होत होती ज्यात बांगलादेशचा वाटा 54 टक्क्यांहून अधिक आहे. तर येमेन, अफगाणिस्तान, कतार आणि इंडोनेशिया सारख्या देशांचा नव्याने बाजारात समावेश झाला आहे.
2020-21 मध्ये भारतीय गहू आयात करणारे शीर्ष दहा देश बांगलादेश, नेपाळ, संयुक्त अरब अमिराती, श्रीलंका, येमेन, अफगाणिस्तान, कतार, इंडोनेशिया, ओमान आणि मलेशिया हे होते.
जगातील गव्हाच्या निर्यातीत भारताचा वाटा १ टक्क्यांहून कमी आहे. हाच वाटा 2016 मध्ये 0.14 टक्क्यांवरून 2020 मध्ये 0.54 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. 2020 मध्ये जगाच्या एकूण उत्पादनात सुमारे 14.14 टक्के वाटा असलेला भारत हा गव्हाचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश बनला आहे.
भारतात दरवर्षी सुमारे 107.59 दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन होते आणि त्यातील मोठा हिस्सा देशांतर्गत वापरासाठी जातो. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार आणि गुजरात ही भारतातील प्रमुख गहू उत्पादक राज्ये आहेत.
इजिप्शियन अधिकाऱ्यांनी या धोरणात्मक कमोडिटीचे मूळ म्हणून भारताला स्थान दिले आहे. इजिप्तमधील कृषी विलगीकरण आणि कीटक जोखीम विश्लेषण अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि पंजाबमधील विविध प्रक्रिया युनिट्स, बंदर सुविधा आणि शेतांना भेट दिल्याचं वाणिज्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
रशिया-युक्रेन संघर्षामुळे पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे पर्यायी स्त्रोतांकडून धान्य मिळवण्याच्या शक्यतांचा शोध घेणाऱ्या विविध गहू आयात करणाऱ्या देशांशी अनेक व्यापार चर्चा आणि बैठकीनंतर इजिप्शियन शिष्टमंडळाची भारत भेट झाली. गेल्या महिन्यात दुबईच्या भेटीदरम्यान, गोयल यांनी इजिप्तचे नियोजन आणि आर्थिक विकास मंत्री हाला अल-सैद यांचीही भेट घेतली होती आणि इजिप्तची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उच्च दर्जाचा गहू पुरवण्याच्या भारताच्या तयारीबद्दल चर्चा केली होती.
इजिप्तने 2021 मध्ये 6.1 दशलक्ष टन (MT) गहू आयात केला आणि भारत आफ्रिकन राष्ट्राला गहू निर्यात करू शकणार्या मान्यताप्राप्त देशांच्या यादीचा भाग नव्हता. इजिप्तच्या गव्हाच्या आयाती पैकी 80 टक्क्यांहून अधिक, 2021 मध्ये USD 2 अब्जच्या जवळपास असेल, जो रशिया आणि युक्रेन मधून होत होता.
या वर्षी इजिप्तला 3 दशलक्ष टन गहू निर्यात करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे असल्याचे कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) चे अध्यक्ष अंगमुथू यांनी सांगितले.
APEDA ने यापूर्वी भारताच्या निर्यातदारांना इजिप्तच्या सार्वजनिक खरेदी एजन्सी - जनरल अथॉरिटी ऑफ सप्लाय अँड कमोडिटीजकडे नोंदणी करण्यासाठी संप्रेषण केले होते, जे उत्तर आफ्रिकन देशातील गहू आणि साखर आयातीचे व्यवस्थापन करते.
भारतातून गहू निर्यात वाढवण्याच्या शक्यतांचा शोध घेण्यासाठी APEDA मोरोक्को, ट्युनिशिया, इंडोनेशिया, फिलीपिन्स, थायलंड, व्हिएतनाम, तुर्की, अल्जेरिया आणि लेबनॉन येथे व्यापारी शिष्टमंडळे पाठवणार आहे.रशिया-युक्रेन संघर्षामुळे धान्याची जागतिक मागणी वाढत असताना भारताने २०२२-२३ मध्ये विक्रमी १० दशलक्ष टन गहू (निर्यात) करण्याचे लक्ष्य ठेवले आहे असल्याचं म्हटले आहे.
परकीय व्यापार महासंचालनालयाच्या अंदाजानुसार, भारताने 2021-22 मध्ये विक्रमी 7 मेट्रिक टन गव्हाची निर्यात केली आहे, ज्याचे मूल्य USD 2.05 अब्ज आहे. बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती, कतार, श्रीलंका, ओमान आणि मलेशिया यांसारख्या देशांच्या मागणीमुळे गव्हाच्या निर्यातीत वाढ झाली.
2020-21 पर्यंत जागतिक गव्हाच्या व्यापारात भारत तुलनेने किरकोळ देश मानला जात होता. भारत 2019-20 आणि 2020-21 मध्ये अनुक्रमे 0.2 मेट्रिक टन आणि 2 मेट्रिक टन गहू निर्यात करू शकला. वाणिज्य मंत्रालयाने गव्हाच्या निर्यातीवर एक टास्क फोर्स स्थापन केला आहे ज्यात वाणिज्य, शिपिंग आणि रेल्वे आणि APEDA च्या तत्वाखाली निर्यातदारांसह विविध मंत्रालयांचे प्रतिनिधी आहेत.
आंध्र प्रदेश मेरिटाईम बोर्ड, जे काकीनाडा अँकरेज बंदर चालवते, मुख्यतः तांदूळ निर्यातीसाठी वापरले जाते, त्यांच्याकडून गहू निर्यातीसाठी सुविधा वापरली जाण्याची शक्यता आहे.