Agriculture News : शेतातील पाणी समस्येवर मात करण्यासाठी शेतकऱ्याचा अप्रतिम 'जुगाड'! व्हिडिओ पाहून सारेच थक्क
viral video : हा व्हिडिओ IFS अधिकारी प्रवीण कासवान यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे.
Agriculture News : आपला देश हा कृषीप्रधान देश आहे, जिथे आजही पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. त्याचबरोबर झपाट्याने बदलणाऱ्या हवामानामुळे अनेक राज्यांमध्ये वेळेवर पाऊस पडला नाही, तर शेतकऱ्यांना त्यांची पिके उद्ध्वस्त होताना पाहावी लागत आहेत. सद्यस्थितीत असे अनेक शेतकरी आहेत की, जे आपल्या प्रत्येक समस्येतून सहजपणे सुटका करून घेताना दिसतात.
देसी जुगाडचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल
अलीकडच्या काळात देसी जुगाडचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. ज्यामध्ये लोकांना अशक्य वाटणारी कामे सहजपणे करतांना पाहून नेटकरी खूप प्रभावित झाले, आता सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये एक शेतकरी आपल्या शेतीसाठी पाण्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी भौतिकशास्त्राची मदत घेताना दिसत आहे.
The value of water. Look how physics is applied in such an easy way. Try explaining the mechanism. Somewhere in Rajasthan. @pritambhurtiya pic.twitter.com/oEpulhRP6c
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) May 4, 2021
IFS अधिकाऱ्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून केला शेअर
व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये एक शेतकरी दोरी न ओढता विहिरीतून पाणी काढण्यासाठी भौतिकशास्त्राचे नियम प्रत्यक्ष जीवनात लागू करताना दिसत आहे. ज्याकडे सर्वजण आश्चर्याने पाहत आहेत. हा व्हिडिओ IFS अधिकारी प्रवीण कासवान यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे.
कॅप्शनमध्ये लिहिले की, 'पाण्याची किंमत...
व्हिडिओ शेअर करताना प्रवीण कासवान यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'पाण्याची किंमत... पाहा भौतिकशास्त्राचा वापर करून ते कसे सोपे करण्यात आले आहे. सध्या सोशल मीडियावर राजस्थानमधील शेतकऱ्याच्या या देसी जुगाडचा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 33 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर 3 हजारांहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत.