Ujani Dam : उजनी धरण 100 टक्के भरणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला अंदाज
Maharashtra Rain : यंदा उजनी धरण 100 टक्के भरणार आहे, असा दावा हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी केला आहे.
![Ujani Dam : उजनी धरण 100 टक्के भरणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला अंदाज Maharashtra Monsoon Ujani dam will fill 100 percent Weather expert Punjabrao Dakh predicted marathi news Ujani Dam : उजनी धरण 100 टक्के भरणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला अंदाज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/162e2326ecec93867ed1cbf362556d5d1718122204151322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पंढरपूर : यंदा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा उजनी धरण (Ujani Dam) 100 टक्के भरणार आहे, असा दावा हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Punjabrao Dakh) यांनी केला आहे. मागील वर्षी सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ पडला होता. मात्र यंदा सोलापूर जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसाळ्यात यंदा उजनी धरण 100 टक्के भरणार असून धाराशिवपासून पुणे, सांगलीपर्यंत दुष्काळी पट्ट्यात चांगला पाऊस पडेल, असं भाकीत हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे याआधी उजणी धरण 2021 मध्ये 100 टक्के भरलं होतं.
उजनी धरण 100 टक्के भरणार
हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Punjabrao Dakh) यांनी वर्षभरातील पावसाचा अंदाज मांडला आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की, 11 ते 14 जून दरम्यान सोलापूर, अहिल्यानगर, सांगली, सातारा, धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. याशिवाय. यंदा जूनमध्येच सर्वाधिक पाऊस असेल, असंही त्यांनी सांगितलं आहे.
हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला अंदाज
जून पेक्षा जुलै महिन्यामध्ये पावसाचा जोर पाऊस असेल तर ऑगस्ट महिन्यात पावसाचं प्रमाण कमी असेल. तसेच सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात सुद्धा कमी पाऊस पडेल, असा अंदाजही डख यांनी वर्तवला आहे. दरम्यान, 5 नोव्हेंबरपासून मान्सून देशातून माघारी फिरेल असं भाकीतही त्यांनी केलं आहे.
उजनीची पाणी पातळी दोन टक्क्यांनी वाढली
उजनी धरण (Ujani Dam) पाणलोट क्षेत्रात 1 जूनपासून 75 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी दोन टक्क्यांनी वाढली आहे. तसेच 1.012 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. भीमा आणि नीरा खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात पडलेल्या दमदार पावसामुळे भीमा खोऱ्यातील उजनीवरील 18 धरणांत दमदार पावसाने हजेरी लावली. जूनच्या पहिल्या आठवड्यात उजनी धरणाची पाणी पातळी वाढू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
एक महिना अगोदर दौंड येथून विसर्ग
गेल्या वर्षी 26 जून रोजी उजनी पाणलोट क्षेत्रात 21 मिमी पाऊस झाला होता. एकूण 461 मिमी पावसाची नोंद झाली होती. तर दौंड येथून उजनी धरणात 11 जुलैपासून पाणी येण्यास सुरुवात झाली होती. यावर्षी एक महिना अगोदर दौंड येथून विसर्ग सुरू झाल्याने सोलापूर, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. नीरा खोऱ्यातील गुंजवणी, नीरा देवधर, नीरा, भाटघर या धरण क्षेत्रात दमदार पावसाचं आगमन झालं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)