Success Story : धुळ्याची केळी इराणच्या बाजारात, नोकरी सांभाळून केळीचा यशस्वी प्रयोग; वाचा सत्यपाल गुजरांची यशोगाथा
Success Story : धुळे (Dhule) जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सत्यपाल गुजर (Satyapal Gurjar) यांनी आधुनिक पद्धतीनं केळीची लागवड करत युवकांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
![Success Story : धुळ्याची केळी इराणच्या बाजारात, नोकरी सांभाळून केळीचा यशस्वी प्रयोग; वाचा सत्यपाल गुजरांची यशोगाथा Maharashtra Agriculture News Young Farmer Successful Banana Farming in Dhule Success Story : धुळ्याची केळी इराणच्या बाजारात, नोकरी सांभाळून केळीचा यशस्वी प्रयोग; वाचा सत्यपाल गुजरांची यशोगाथा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/09/a5a9bdc6a172cb9a4a53e9e6f6da48001675917026968339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Success Story : शेतकऱ्यांना (Farmers) सातत्यानं विविध संकटांचा सामना करावा लागतो. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट येत. मात्र, या संकटाचा सामना करत काही शेतकरी चांगले उत्पादन घेत आहे. उच्चशिक्षित युवक देखील शेतीत वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. असाच एक वेगळा प्रयोग धुळे (Dhule) जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील अर्थे खुर्द येथील युवा शेतकरी सत्यपाल गुजर यांनी केला आहे. सत्यपाल गुजर (Satyapal Gurjar) यांनी आधुनिक पद्धतीनं केळीची लागवड करत युवकांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांची इराणमध्ये केळीची निर्यात केली आहे.
Successful Banana Farming : ST महामंडळाची नोकरी सांभाळून प्रयोगशील शेती
सत्यपाल गुजर हे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील अर्थे खुर्द येथील युवा शेतकरी आहेत. ते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची नोकरी सांभाळून गावी असलेल्या वडिलोपार्जित शेतीत आधुनिक पद्धतीने शेती करतात. त्यांनी केळीची आधुनिक पद्धतीने शेती केली आहे. गेल्या पाच वर्षात आपल्या शेतीकडे प्रयोगशीलतेच्या दृष्टीनं पाहणाऱ्या सत्यपाल गुजर यांनी एप्रिल महिन्यात केळी लागवड केली होती. तेव्हापासून केळी व्यवस्थापन करुन अवघ्या नवव्या महिन्यात आपल्या शेतातील केळी परिपक्व केली आहे. आता त्यांची केळी आखाती देशांमध्ये म्हणजेच इराणमध्ये निर्यात होते. या केळीच्या माध्यमातूनदेशाला परकीय चलन प्राप्त होत आहे. तसेच त्यांना याचा चांगला फायदा होत आहे.
Banana Price : क्विंटलला केळीला 3 हजार 31 रुपयांचा दर
सत्यपाल गुजर यांनी एप्रिल 2022 मध्ये अजित सीड कंपनीचे जी-नऊ हे केळीचे उती संवर्धित रोप शेतीत लागवड केले. सध्या त्यांची केळी इराणमध्ये निर्यात केली जाते. या कामात त्यांना वितरण व्यवस्थापक गुणवंत मोरे आणि संचालक बलराम राजपूत व्यवस्थापकीय संचालक निलेश राजपूत यांची मदत झाली. सध्या त्यांची दोन एकर केळी आहे. पहिल्याच खेपेत त्यांनी 12 टन केळी इराणमध्ये निर्यात केली आहे. यावेळी आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट भाव केळी पिकाला मिळाला असून 3 हजार 31 रुपये क्विंटल दराने केळी निर्यात केली आहे. निर्यातक्षम केळी आपल्या गावातून निर्यात होऊ शकते हे युवा शेतकऱ्याने सिद्ध केले आहे. परिसरातील युवा शेतकरी सत्यपाल गुजर यांच्या लागवड केलेल्या केळी शेताला भेट देत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
Strawberry and Dragon Fruit : अर्धा एकरात लाखोंचा नफा, ड्रॅगन फ्रूटसह स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती; मिर्झापूरच्या वंदना सिंह यांची यशोगाथा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)