एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Success Story : नोकरी सोडून कोरफडीची शेती, गावातच सुरु केली कंपनी; भंडाऱ्याचा खेमराज कमावतोय लाखोंचा नफा

Success Story : भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील रोहणी या गावातील तरुण नोकरी सोडून कोरफडीची (Aloe vera) शेती करत आहे. या शेतीतून तो लाखो रुपयांचा नफा कमवत आहे.

Success Story : अलिकडच्या काळात काही तरुण शेतकरी (Farmers) शेतात नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. पारंपारिक पद्धतीनं शेती न करता आधुनिक पध्दतीनं शेती करत आहेत. तर काही उच्चशिक्षीत तरुण नोकरी न करता शेती करताना दिसत आहेत. भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील रोहणी या गावातील तरुण नोकरी सोडून कोरफडीची (Aloe vera) शेती करत आहे. यामधून तो लाखो रुपये कमावतोय. खेमराज भुते (Khemraj Bhute) असं या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. 

खेमराज भुते यांनी एम फार्मपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर एका मोठ्या कंपनीत फार्मासिटिकल्सची नोकरी सांभाळली. मात्र, दुसऱ्याची नोकरी करण्यापेक्षा गावातील वडिलोपार्जित शेतीत काहीतरी नवीन करुन स्वतःचा उद्योग उभारावा, यासाठी नोकरी सोडून गाव गाठणाऱ्या पठ्ठ्यानं शेतात कोरफडीची लागवड केली. आता गावातच स्वतःची कंपनी सुरु केली आहे. या माध्यमातून उत्पादित ज्यूस, जेल, फूड आणि स्किन केअर प्रॉडक्ट राज्यातच नव्हे तर सातासमुद्रापार अमेरिका, जर्मनी, रशिया आणि दुबईपर्यंत पोहोचलं आहे. त्यांच्या उत्पादनाला मोठी मागणी वाढल्यानं, सोडलेल्या नोकरीचे फलित झाल्याचं समाधान भुते यांनी व्यक्त केलं.


Success Story : नोकरी सोडून कोरफडीची शेती, गावातच सुरु केली कंपनी; भंडाऱ्याचा खेमराज कमावतोय लाखोंचा नफा

साडेतीन एकरात नाविन्यपूर्ण कोरफडीची शेती

भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील जेमतेम तीन हजार लोकवस्तीच्या रोहणी या गावातील खेमराज भुते हे यशस्वी उद्योजक आहेत. एम फार्मपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या खेमराज भुते यांनी सुरुवातीला एका मोठ्या कंपनीत फार्मासिटिकलस् म्हणून नोकरी सांभाळली. मात्र, स्वतःच्या अंगात गुण असतानाही दुसऱ्याकडे नोकरी का करावी, या उद्देशानं झपाटलेल्या खेमराज यांनी कालांतराने नोकरी सोडत थेट गाव गाठलं. वडीलोपार्जित शेतीतील साडेतीन एकरात खेमराजनं नाविन्यपूर्ण कोरफडीची शेती केली. सुरुवातीला गावातील अनेकांनी त्याला याबाबत उपदेशाचे डोज पाजलेत. मात्र, आता तेच लोक याचा यशस्वी उद्योग बघून त्याच्याकडं नाविन्यपूर्ण शेतीसाठी मार्गदर्शन घेत आहेत. 


Success Story : नोकरी सोडून कोरफडीची शेती, गावातच सुरु केली कंपनी; भंडाऱ्याचा खेमराज कमावतोय लाखोंचा नफा

भारतासह अमेरिका, जर्मनी, रशिया, दुबईतून प्रॉडक्टला मागणी 

पारंपरिक धान पिकाला फाटा देऊन खेमराजनं केलेल्या या कोरफडीच्या शेतीसह लघु उद्योगातून गावातील 15 ते 20 जणांना रोजगार मिळाला आहे. कोरफडीतून आता छोट्याशा रोहिणी या गावातच शरीराला आरोग्यवर्धक ज्यूस, चेहऱ्याला लावणारे विविध प्रकारचे स्किन केअर जेल, खाद्यपदार्थ याची निर्मिती करण्यात येत आहे. मोठमोठ्या कंपन्यांच्या तुलनेत खेमराजच्या कंपनीतून तयार होणाऱ्या प्रॉडक्टची किंमतही कमी आहे. यामुळं परिसरात त्यांच्या प्रॉडक्टला मोठी मागणी आहे. एवढेच नव्हे तर, राज्यातील कानाकोपऱ्यात त्यांचे प्रॉडक्ट विकलं जात असून, आता तर अमेरिका, जर्मनी, रशिया, दुबईसह अन्य देशातही त्यांच्या प्रॉडक्टला मोठी मागणी वाढली आहे. 


Success Story : नोकरी सोडून कोरफडीची शेती, गावातच सुरु केली कंपनी; भंडाऱ्याचा खेमराज कमावतोय लाखोंचा नफा

साडेतीन एकरात निव्वळ तीन लाखांचा नफा

वडिलोपार्जित साडेतीन एकरात लावलेल्या कोरफडीच्या शेतीतून त्यांना 65 हजार रुपये वार्षिक खर्च येतो. त्यातून त्यांना तीन लाखांचा निव्वळ नफा प्राप्त होत आहे. पहिला प्रयोग यशस्वी झाल्यानं आता त्यांनी गावातील अन्य एकरबर शेती भाडेतत्त्वावर घेतली असून, त्यातही त्यांनी आता कोरफडीची लागवड केली आहे. या माध्यमातून धान पिकापेक्षा आधुनिक शेतीतून त्यांनी मोठी आर्थिक प्रगती साधली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Skin Care Tips : सुंदर आणि ग्लोइंग स्किनसाठी घरच्या घरी 'असा' बनवा एलोवेरा फेसपॅक; 'ही' पद्धत वापरा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Mahajan On BJP | भाजपने युती धर्म पाळला नाही, मनसेला एकटं पाडलं, प्रकाश महाजनांची टीकाManoj Jarange on Devendra Fadnavis | तू पुन्हा आला की मी पुन्हा बसणार, जरांगेंचा फडणवीसांना इशाराKangana Ranaut On HIndu : देशात अजूनही हिंदू काही ठिकाणी फिरु शकत नाहीRaj Thackeray MNS Symbol :राज ठाकरेंच्या मनसेची मान्यता रद्द होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
Embed widget