एक्स्प्लोर

Baramati Agriculture : बारामतीत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान अन् भाजीपाला लागवडीचे धडे; शेतकऱ्यांना  1 कोट्यावधी रोपांचा पुरवठा

शेतीमध्ये भाजीपाला लागवड पद्धती आणि उत्पादन संदर्भातील धडे बारामतीत शेतकऱ्यांना दिले जात आहे. बारामती कृषि विज्ञान केंद्र  येथील भाजीपाला गुणवत्ता केंद्रात गेल्या पाच वर्षापासून शेतकऱ्यांना यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे.

Baramati Agriculture : शेतीमध्ये भाजीपाला लागवड पद्धती आणि उत्पादन यासाठी नवीन तंत्र कोणते आणि ते कसे वापरावे याचे धडे बारामतीत शेतकऱ्यांना दिले जात आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्र  येथील भाजीपाला गुणवत्ता केंद्रात गेल्या पाच वर्षापासून शेतकऱ्यांना यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत इंडो डच तंत्रज्ञानावर आधारीत महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ पुणे अंतर्गत हा उपक्रम सुरु आहे. या उपक्रमाचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. 

भाजीपाला उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये चीननंतर दुसरा क्रमांक आहे. दिवसेंदिवस आपल्या देशातील भाजीपाल्याचे उत्पादन मागणीनुसार वाढत आहे. वातावरणातील बदलानुसार बहुतांश शेतकरी संरक्षित शेती म्हणून पॉलीहाउस शेतीकडे वळत आहे. यामध्ये प्रामुख्याने पॉलीहाउसमध्ये रंगीत ठोबळी मिरची, काकडी, टोमॅटो, चेरी टोमॅटो व परदेशी भाजीपाला पिकांची लागवड करण्यात येत आहे. भाजीपाला पिके उत्पादनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना कमी कालावधीत जास्त नफा मिळवून देत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजीपाला गुणवत्ता केंद्र शेतकऱ्यांसाठी अधिक उपयुक्त आहे.

दीड कोटीपेक्षा अधिक रोपांचा पुरवठा

भाजीपाला गुणवत्ता केंद्राची स्थापना नोव्हेंबर 2017 मध्ये करण्यात आली.  या केंद्रातर्फे आतापर्यंत शेतकऱ्यांना  1 कोटी 68 लाख 33 हजार रोपांचा पुरवठा करण्यात आला आहे. आठ हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांना भाजीपाला उत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञान व इतर संबंधित बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. केंद्रात  आधुनिक पद्धतीने भाजीपाला उत्पादनाची 21 प्रात्यक्षिके आणि  शेतकऱ्याच्या शेतात 92 भाजीपाला उत्पादनाची प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. याचा लाभही शेतकऱ्यांना झाला आहे.

भाजीपाला गुणवत्ता केंद्रातील सुविधा

हरितगृहातील अत्याधुनिक डच तंत्रज्ञान वापरून उत्तम दर्जाची रोग व कीड मुक्त भाजीपाला रोपे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पुरवली जातात. रोपांच्या विक्रीपश्चातत शेतकऱ्यांना  लागवडीबाबत मार्गदर्शन केले जाते. हरितगृहमधील वेगवेगळ्या भाजीपाला पिकांची उच्च तंत्रज्ञानाची प्रत्यक्षिके दाखवली जातात. आधुनिक व स्वयंचलित यंत्रणेच्या सहायाने पाण्याच व खतांचा योग्य प्रमाणात वापर कशाप्रकारे करतात याची माहिती त्यांना दिली जाते.

केंद्रात शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनी , कृषी अधिकारी , विद्यार्थी खाजगी संस्था व उद्योजक यांच्यासाठी प्रशिक्षण सुविध आहे. विषमुक्त भाजीपाला उत्पादन व यांचे विक्री व्यवस्थापन याबाबतदेखील येथे मार्गदर्शन केले जाते. कृषि विज्ञान केंद्र निर्मित विविध दर्जेदार जैविक कीटकनाशके , जैविक बुरशीनाशके तसेच विविध मायक्रोन्यूट्रीयंट रास्त दरामध्ये शेतकऱ्यांसाठी येथे उपलब्ध आहेत.

केंद्रात माती ,पाणी तसेच पान व देठ परीक्षण प्रयोगशाळेची उपलब्धता आहे. सेंद्रिय तसेच विषमुक्त उत्पादीत मालाला भारतीय तसेच परदेशी बाजारपेठ मिळवून देण्यास  शेतकऱ्यांना येथे योग्य मार्गदर्शन करण्यात येते. करार शेतीच्या माध्यमातून भाजीपाला मूल्यवर्धित साखळी तयार  करण्यास मदत होत असल्याने उत्पादित मालाला  योग्य हमीभाव मिळतो.

भाजीपाला गुणवत्ता केंद्राअंतर्गत पॉलीहाउस मधील रंगीत ढोबळी  मिरची, टोमॅटो व काकडी यांचे तांत्रिकदृष्ट्या  उत्पादन घेण्यासाठी  शेतकरी माहिती मिळवून चांगल्याप्रकारे उत्पन्न मिळवत आहेत. इतर भाजीपाल्यांबाबतही चांगले मार्गदर्शन मिळत असल्याने शेतकऱ्यांना भाजीपाला गुणवत्ता केंद्राचा लाभ होत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pankaja Munde : आत्महत्या केलेल्या गणेश बडेच्या दोन्ही मुलींची जबाबदारी मी घेणार, पंकजा मुंडेंनी केलं कुटुंबियांचं सांत्वन
आत्महत्या केलेल्या गणेश बडेच्या दोन्ही मुलींची जबाबदारी मी घेणार, पंकजा मुंडेंनी केलं कुटुंबियांचं सांत्वन
Nagpur Accident : नागपुरात कन्हान नदीच्या पुलावर खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात,  सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
उपराजधानी नागपूरमध्ये खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात, सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Waikar Special Report : रवींद्र वायकर यांच्या माणसाजवळ EVM चा ओटीपी?ABP Majha Headlines : 11 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha | 16 June 2024Elon Musk EVM Special Report : एलॉन मस्क यांचा ईव्हीएमवर सवाल, भारतातही पेटला वाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pankaja Munde : आत्महत्या केलेल्या गणेश बडेच्या दोन्ही मुलींची जबाबदारी मी घेणार, पंकजा मुंडेंनी केलं कुटुंबियांचं सांत्वन
आत्महत्या केलेल्या गणेश बडेच्या दोन्ही मुलींची जबाबदारी मी घेणार, पंकजा मुंडेंनी केलं कुटुंबियांचं सांत्वन
Nagpur Accident : नागपुरात कन्हान नदीच्या पुलावर खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात,  सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
उपराजधानी नागपूरमध्ये खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात, सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Embed widget