एक्स्प्लोर

E-Peek Pahani : ई-पीक पाहणीसाठी नवीन सुविधायुक्त ॲप, सुधारीत अॅप 1 ऑगस्टपासून शेतकऱ्यांसाठी उलपब्ध

ई-पीक पाहणी (E-Peek Pahani) प्रकल्पाच्या ई-पीक पाहणीसाठी नवीन सुविधायुक्त सोपे आणि सुलभ ॲप तयार करण्यात आलं आहे.  

E-Peek Pahani : ई-पीक पाहणी (E-Peek Pahani) प्रकल्पाच्या ई-पीक पाहणीसाठी नवीन सुविधायुक्त सोपे आणि सुलभ ॲप तयार करण्यात आलं आहे. स्थानिक पातळीवरुन आलेल्या सूचनांच्या आधारे ई-पीक पाहणी मोबाईल अॅपमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे व सुलभ मोबाईल अॅप व्हर्जन-2 विकसित करण्यात आलं आहे. हे सुधारित मोबाईल अॅप 1 ऑगस्ट 2022 पासून शेतकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

 पीक पाहणीपैकी 10 टक्के नोंदीची पडताळणी तलाठ्यांमार्फत करण्यात येणार 

सुधारित मोबाईल अॅपमध्ये राज्यातील प्रत्येक गटाच्या मध्यबिंदूचे अक्षांश व रेखांश समाविष्ट करण्यात आले आहे. शेतकरी ज्यावेळी पीक पाहणी करताना पिकाचा फोटो घेतील, त्यावेळी छायाचित्र घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदूपर्यंतचे अंतर आज्ञावलीमध्ये दिसणार आहे. शेतकरी पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटापासून दूर असल्यास त्यांना त्याबाबतचा संदेश मोबाईल अॅपमध्ये दर्शवण्यात येणार आहे. या सुविधेमुळं पिकाचे अचूक छायाचित्र घेतले किंवा नाही हे निर्धारित करता येणार आहे. शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीद्वारे नोंदवलेल्या पिकांबाबत आज्ञावलीमध्ये स्वयंघोषणापत्र घेतले जाणार आहे. शेतकऱ्यांनी केलेली ई-पीक पाहणी स्वयंप्रमाणित मानण्यात येऊन, ती गाव नमुना नंबर 12 मध्ये प्रतिबिंबीत होणार आहे. शेकऱ्यांनी केलेल्या पीक पाहणीपैकी 10 टक्के नोंदीची पडताळणी तलाठ्यांमार्फत करण्यात येणार आहे. तलाठी हे पडताळणीअंती आवश्यक असल्यास दुरुस्ती करून त्या नोंदी सत्यापित करतील व त्यानंतर त्या गाव नमुना नंबर 12 मध्ये प्रतिबिंबीत होतील.

मोबाईल अॅपद्वारे नोंदवलेली पीक पाहणी 48 तासामध्ये दुरुस्त करता येणार

शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे नोंदवलेली पीक पाहणी 48 तासामध्ये स्वतःहून केव्हाही एक वेळेस दुरुस्त करता येईल. किमान आधारभूत योजनेअंतर्गत येणाऱ्या पिकांची ई-पीक पाहणीसाठी नोंदणी केल्यास अशा शेतकऱ्यांची माहिती वेब आज्ञावलीद्वारे पुरवठा विभागाला दिली जाणार आहे. त्याआधारे पुरवठा विभागाच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत अशा शेतकऱ्यांची नोंदणी आपोआप होणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना खरेदी केंद्रामध्ये जाऊन रांगेत उभे राहून नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही.

तीन दुय्यम पिके नोंदविण्याची सुविधा उपलब्ध

दरम्यान, यापूर्वीच्या मोबाईल अॅपमध्ये असलेल्या मुख्य पीक व दोन दुय्यम पिके नोंदवण्याच्या सुविधेऐवजी तीन दुय्यम पिके नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचबरोबर दुय्यम पिकांचा लागवडीचा दिनांक, हंगाम व क्षेत्र नोंदवण्याची सुविधादेखील देण्यात आलेली आहे. त्यामुळं दुय्यम पिकांची अचूक माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. ई-पीक पाहणी मोबाईल अॅपमध्येच त्या गावातील खातेदारांनी नोंदवलेल्या पीक पाहणीची माहिती पाहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याद्वारे खातेदारांना पीक पाहणीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास वेळेत तलाठीकडे अर्ज करणे शक्य होणार आहे.

अडचणींचे निराकरण करण्यासाठी अॅपमध्ये 'मदत' पर्याय

वापरकर्त्याला ई-पीक पाहणी मोबाईल अॅप वापरताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी अॅपमध्ये 'मदत' हे बटन देण्यात आलेले आहे. या बटणवर क्लिक केल्यावर नेहमी विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे देण्यात आलेली आहेत. याचा वापर करुन शेतकरी अॅप वापरताना येणाऱ्या अडचणी सोडवू शकतील. प्रत्येक खातेदाराने आपला पीक पेरा या ई-पीक पाहणी अॅपद्वारे नोंदवणं गरजेचे आहे. कारण ई-पीक पाहणीच्या नोंदी या पीक विमा व पीक विमा दावे निकाली काढण्यासाठी, पीक कर्ज वाटप, नैसर्गिक आपत्तीमुळं पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे आदी बाबींसाठी आवश्यक असणार आहेत.

खरीप हंगाम 2022 च्या पीक पाहणीची कार्यवाही 1 ऑगस्ट 2022 पासून सुरु होत आहे. यासाठी वर नमूद केल्याप्रमाणं सुधारित ई-पीक पाहणी मोबाईल अॅप व्हर्जन-2 गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी सुधारित मोबाईल अॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन खरीप हंगामातील पीक पाहणी विहित वेळेत पूर्ण करावी, असं आवाहन संचालक भूमी अभिलेख पुणे यांच्याकडून करण्यात आलं आहे. 

 ई-पीक पाहणी प्रकल्पाविषयी

महाराष्ट्र शासनाचा ई-पीक पाहणी हा महत्वाकांक्षी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून संपूर्ण राज्यात राबवण्यात येत असून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला 1 वर्ष पूर्ण झाले आहे. गतवर्षीपासून सुमारे 1 कोटी 11 लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी भ्रमणध्वनी अॅपमध्ये नोदणी केली आहे. मागील खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये या प्रकल्पा अंतर्गत शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकांची नोंदणी करुन या प्रकल्पास उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. गतवर्षी खरीप हंगामामध्ये 99 लाख 57 हजार 944 हेक्टर, रब्बी हंगामामध्ये 22 लाख्ख 52 हजार 56 हेक्टर, उन्हाळी हंगामामध्ये 2 लाख 91 हजार 133 हेक्टर क्षेत्रावर तर बहुवार्षिक पिकांतर्गत 44 लाख 12 हजार 386 हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी अॅपद्वारे पिकांची नोंदणी केली आहे. त्याचप्रमाणे ई-पीक पाहणी अॅपद्वारे 400 च्यावर वेगवेगळ्या पिकांच्या नोंदी घेण्यात आलेल्या आहेत. खरीप हंगाम 2022 मध्ये ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे नोंदविण्याची कार्यवाही 1 ऑगस्ट 2022 पासून सुरु होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
Sanjay Raut : रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल

व्हिडीओ

Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास
Raj Thackeray Mumbai : ..आणि शाई पुसा, परत जा… मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
Sanjay Raut : रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
Gold Rate : सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
पुण्यात गावाकडनं आणले मतदार, सोलापुरात कर्नाटकातून गाड्या भरल्या; बोगस मतदारांचा सुळसुळाट
पुण्यात गावाकडनं आणले मतदार, सोलापुरात कर्नाटकातून गाड्या भरल्या; बोगस मतदारांचा सुळसुळाट
Embed widget