एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

Agriculture News : अवकाळीमुळं खडकाळ जमिनीवर फुलवलेली आंब्याची बाग उध्वस्त, नांदेड जिल्ह्यातील शेतकरी संकटात 

नांदेड जिल्ह्यातही गेल्या आठ दिवसापासून अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळं कंधार तालुक्यातील बारुळ येथील शेतकऱ्याच्या केशर आंब्याच्या बागेचं मोठं नुकसान झालं आहे.

Agriculture News : सध्या राज्यातील शेतकरी (Farmers) अडचणीत सापडला आहे. कारण बदलत्या हवामानाचा (Climate Change) शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. सध्या राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस सुरु आहे. कुठे अवकाळी तर कुठे उन्हाचा तडाखा पाहायला मिळत आहे. दरम्यान, या अवकाळी पावसामुळं आणि गारपीटीमुळं शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी होत आहे. नांदेड जिल्ह्यातही गेल्या आठ दिवसापासून अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळं कंधार तालुक्यातील बारुळ येथील शेतकऱ्याच्या केशर आंब्याच्या बागेचं मोठं नुकसान झालं आहे. मोठ्या कष्टानं उभारलेली बाग अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं वाया गेली आहे. 

या हंगामात तीन लाख रुपयाचं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती

कंधार तालुक्यातील बारुळ येथील प्रकाश बळीराम वाखरडे या तरुण शेतकऱ्यानं व्यवसाय करत गावाकडील खडकाळ जमिनीवर तीन एकरात नैसर्गिक पद्धतीने केशर आंब्याची बाग फुलवली आहे. केशर आंब्याला सध्या बाजारात मोठी मागणी आहे. शिवाय चांगला भाव मिळाल्याने एका हंगामातच तीन लाख रुपयाचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्याला होती. मात्र, अवकाळी पाऊस आणि गारपीटीने खडकाळ जमिनीवरील सगळ्या आंब्याच्या बागेचं नुकसान झालं आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकरी प्रकाश बळीराम वाखरडे यांना बसला आहे. 

अवकाळी पावसानं शेतकऱ्याच्या स्वप्नांवर पाणी

दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार गेल्या आठ दिवसापासून नांदेड जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. या अवकाळी अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं बारुळ, तालुका कंधार येथील प्रकाश बळीराम वाखरडे या शेतकऱ्याचे मोठं नुकसान केलं आहे. नांदेड येथे व्यवसाय करत असताना प्रकाश वाखरडे यांनी आपल्या शेततात केशर आंबा आणि चिकू बागेची लागवड केली होती. चागलं उत्पन्न होईल या अपेक्षेने खडकाळ जमिनीची त्यांनी चांगली देखभाल केली. मात्र, अवकाळी पावसाने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरलं आहे. 

प्रकाश बळीराम वाखरडे यांनी खडकाळ जमिनीवर आंब्याची बाग आणि चिकूची बाग केली आहे. बागेची लागवड करताना त्यांनी खड्ड्यामध्ये पहिला थर बुरशीनाशक पावडरचा टाकला. दुसऱ्या थरामध्ये पाला पाचोळा टाकला. तिसऱ्या थरामध्ये माती टाकण्यात आली आणि चौथ्या थरामध्ये शेणखत टाकण्यात आले. शेवटी माती टाकून पुन्हा त्याला अजून दहा दिवस तळू देण्यात आले. त्यानंतर जूनमध्ये त्यांनी आपल्या शेतात तयार केलेल्या खड्ड्यामध्ये 30 बाय 30 वर 60 आंब्याची झाडे आणि 120 चिकूची झाडे नैसर्गिक पद्धतीने लागवड केली. चार वर्षे सदरच्या झाडाला फळधारणाही होऊ दिली नाही. तसेच चार वर्षमध्ये आंतरपीक म्हणून सोयाबीन आणि भुईमूग घेतले होते. यावर्षी आब्याच्या बागेला चांगले फळ लागले होते. मात्र, अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : 'आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही'; नागपुरात भाजप-अजितदादांच्या राष्ट्रवादीत वादाची ठिणगी, नेमकं काय घडलं?
'आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही'; नागपुरात भाजप-अजितदादांच्या राष्ट्रवादीत वादाची ठिणगी, नेमकं काय घडलं?
Haryana Vidhan Sabha Election Result 2024: हरियाणात काँग्रेसची मुसंडी, एकहाती सत्ता स्थापन करणार का? भाजपची स्थिती काय?
हरियाणात काँग्रेसची मुसंडी, एकहाती सत्ता स्थापन करणार का? भाजपची स्थिती काय?
Astrology : आज सौभाग्य योगाच्या निर्मितीमुळे 5 राशींचं नशीब फळफळणार; धन-संपत्तीत होणार वाढ, घराचं स्वप्नही होणार पूर्ण
आज सौभाग्य योगाच्या निर्मितीमुळे 5 राशींचं नशीब फळफळणार; धन-संपत्तीत होणार वाढ, घराचं स्वप्नही होणार पूर्ण
Laxman Hake : शरद पवार, एकनाथ शिंदेंच्या सांगण्यावरून जरांगे स्वतःची गादी निर्माण करताय, लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
शरद पवार, एकनाथ शिंदेंच्या सांगण्यावरून जरांगे स्वतःची गादी निर्माण करताय, लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha  Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स :  Marathi News Headlines : 9 AM 08 October 2024Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा :  08 October 2024 : ABP MajhaABP Majha  Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स :  Marathi News Headlines : 7 AM 08 October 2024Jammu Kashmir Haryana Resultहरियाणात काँग्रेस 32 जागांवर आघाडीवर, लाडवामधून मुख्यमंत्री सैनी आघाडीवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : 'आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही'; नागपुरात भाजप-अजितदादांच्या राष्ट्रवादीत वादाची ठिणगी, नेमकं काय घडलं?
'आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही'; नागपुरात भाजप-अजितदादांच्या राष्ट्रवादीत वादाची ठिणगी, नेमकं काय घडलं?
Haryana Vidhan Sabha Election Result 2024: हरियाणात काँग्रेसची मुसंडी, एकहाती सत्ता स्थापन करणार का? भाजपची स्थिती काय?
हरियाणात काँग्रेसची मुसंडी, एकहाती सत्ता स्थापन करणार का? भाजपची स्थिती काय?
Astrology : आज सौभाग्य योगाच्या निर्मितीमुळे 5 राशींचं नशीब फळफळणार; धन-संपत्तीत होणार वाढ, घराचं स्वप्नही होणार पूर्ण
आज सौभाग्य योगाच्या निर्मितीमुळे 5 राशींचं नशीब फळफळणार; धन-संपत्तीत होणार वाढ, घराचं स्वप्नही होणार पूर्ण
Laxman Hake : शरद पवार, एकनाथ शिंदेंच्या सांगण्यावरून जरांगे स्वतःची गादी निर्माण करताय, लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
शरद पवार, एकनाथ शिंदेंच्या सांगण्यावरून जरांगे स्वतःची गादी निर्माण करताय, लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
Pune Crime News: पिंपरी-चिंचवडमध्ये 12 वर्षीय मुलीने जीवन संपवलं; वडिलांनी केला प्रकरणाचा तपास, खिश्यात मिळाली चिठ्ठी अन् कारण आलं समोर
पिंपरी-चिंचवडमध्ये 12 वर्षीय मुलीने जीवन संपवलं; वडिलांनी केला प्रकरणाचा तपास, खिश्यात मिळाली चिठ्ठी अन् कारण आलं समोर
Shani 2024 : दिवाळीनंतर शनीची सरळ चाल; 'या' 5 राशींना येणार सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह धनात होणार अपार वाढ
दिवाळीनंतर शनीची सरळ चाल; 'या' 5 राशींना येणार सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह धनात होणार अपार वाढ
गरबा किंगला पुण्यात दांडिया खेळताना हार्टअटॅक; मुलासमोर जागेवरच खाली कोसळला अन् खेळ संपला
गरबा किंगला पुण्यात दांडिया खेळताना हार्टअटॅक; मुलासमोर जागेवरच खाली कोसळला अन् खेळ संपला
VIDEO:
"सर, तुम्ही आलात म्हणून मी आलो…"; झापुक झुपूक सूरजची रितेश भाऊला कडकडून मिठी, नेमकं काय घडलं?
Embed widget