Agriculture News : हरभरा खरेदी केंद्र कधी सुरु होणार? अद्याप नाफेडकडून नोंदणी नाही; हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत
Agriculture News : हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात हरभरा खरेदीसाठी नाफेडच्या (Nafed) केंद्रांवर नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळं शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
Hingoli Agriculture News : हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील हरभरा (Gram Crop) उत्पादक शेतकरी (Farmers) अडचणीत सापडले आहेत. अद्यापही हरभरा खरेदीसाठी नाफेडच्या (Nafed) केंद्रांवर नोंदणी प्रक्रिया सुरु झालेली नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरवर्षी हिंगोलीत हरभरा खरेदीसाठी नाफेडच्या वतीने हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले जातात. पण अद्याप त्याबाबत हालचाल झालेली दिसत नाही.
Gram Crop MSP : हरभऱ्याला हमीभाव 5 हजार 300 रुपयांचा, विक्री मात्र 4 हजार 100 रुपयांनी
सध्या हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी हरभरा काढणी सुरु झाली आहे. यंदा हरभऱ्याला प्रतिक्विंटल पाच हजार 300 रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. मात्र काढणी केलेला हरभरा आता चार हजार 100 रुपयांनी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कमी पाण्यावर येणारं पीक म्हणून हरभरा पिकाला ओळखले जाते. याशिवाय हरभऱ्याची विक्री हमी भावाने होत असल्याने शेतकरीसुद्धा हरभरा लागवडीला प्राधान्य देत असतात.
Gram Cultivation : यावर्षी राज्यात 29 लाख 20 हजार हेक्टरवर हरभऱ्याची लागवड
यावर्षी राज्यात एकूण 29 लाख 20 हजार हेक्टरवर हरभरा पिकाची लागवड करण्यात आली होती. यंदा हरभरा पिकासाठी वातावरण देखील चांगले असल्यानं उत्पादनही चांगले निघत आहे. परंतु उत्पादित हरभरा विकायचा कुठे? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. कारण नाफेडच्या वतीने हरभरा हमीभावाने खरेदी केला जातो. परंतु या खरेदीची नोंदणीच अद्याप सुरु झाली नाही. त्यामुळे हरभऱ्याची खरेदी कधी सुरु होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. परिणामी नाईलाजास्तव शेतकरी हरभरा मार्केटमध्ये विकत आहेत. तिकडे हा हरभरा 4 हजार 300 रुपये दरानं विक्री होत आहे. तर हरभऱ्याचा हमीभाव हा 5 हजार 335 रुपये इतका आहे. सध्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1 हजार रुपये आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे नाफेडवरील ऑनलाईन नोंदणी सुरु करुन खरेदी सुरु करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक फटका
दरवर्षी नाफेडच्या माध्यमातून राज्यात विविध राज्य अभिकर्ता संस्थेकडून किमान हमी दरानुसार शेतीमाल खरेदी केला जातो. यामध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, तांदूळ, कापूस, हरभरा पिकांचा समावेश असतो. सध्या शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची काढणी केली आहे. मात्र, नाफेडकडून अद्याप खरेदी केंद्र सुरु करण्यात आली नाहीत. त्यामुळे शेतकरी बाजारात हरभऱ्याची कमी दराने विक्री करत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: