एक्स्प्लोर

Washim News: वाशिम जिल्ह्यात रब्बी पिक धोक्यात, हरभरा पिकावर मर रोग आल्याने शेतकरी अडचणीत

Washim News : दरवर्षीच्या तुलनेत मर  रोगाचे प्रमाण जास्त आहे.  खरीप पिक अतिपावसाने  गेल्यानंतर रब्बी पिकही जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी पुन्हा  चिंतेत आहे

 वाशिम: वाशिम जिल्ह्यात (Washim)  शेतकरी पुन्हा  एक वेगळ्या संकटात सापडला आहे.   जिल्ह्यात रब्बी पिक म्हणून मोठ्या  प्रमाणात  हरभरा पिक घेतला  जातो. मात्र हरभरा  पिकावर सतत ढगाळ वातावरण अवकाळी पाउस आणि थंडी गायब होऊन बदलत चाललेल्या  वातावरणाचा  फटका    हरभरा  पिकाला बसत आहे. त्यामुळे हरभरा  पिकावर  मर रोग  येत आहे.

पेरणीनंतर उगवलेले  झाड  जागीच पिवळे पडून मरत आहे.  दरवर्षीच्या तुलनेत मर  रोगाचे प्रमाण जास्त आहे.  खरीप पिक अतिपावसाने  गेल्यानंतर रब्बी पिकही जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याने  शेतकरी पुन्हा  चिंतेत आहे.  यावर्षी मर रोगाचे प्रमाण  10 ते 15 टक्के असल्याची माहिती आहे.  त्यामुळे महागडी फवारणी करुन देखील फरक पडत नसल्याने  शेतकऱ्यांच्या चिंता  वाढल्या  आहेत.

ज्या शेतकऱ्यांनी पेरणी करताना रासायनिक आणि जैविक बीज प्रक्रिया करून पेरणी केली. अशा शेतकऱ्यांच्या शेतात हरभरा पिकावर मर रोगाचे प्रमाण कमी आहे. तर पारंपारिक पद्धतीने पेरणीची पद्धत बदलून बी.बी.एफ. पद्धतीने पेरणी केल्यास त्याचा चांगला फायदा होतो,  असे  मत पंजाबराव देशमुख कृषी संशोधन केंद्र वाशिमचे शेती तज्ञ डॉ. बी. डी. गीते यांनी सांगितले.

अगोदरच खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. आता वातावरणातील बदल आणि जास्त प्रमाणात पडलेल्या पाऊसामुळे हरभरा पिकाची वाढ खुंटली आहे. तर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला त्यामुळे खरिपानंतर आता रब्बीचे पिक सुद्धा धोक्यात आले आहे.  शासनाने मदतीचा हात पुढे करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. 

हरभरा पिकावरील मर रोग आटोक्यात नाही आला तर शेतकरी मोठ्या अडचणीत सापडून आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलण्याची शक्यता आहे.  येत्या काळात  संशोधित बियाणे तयार करून शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले तर शेतकरी बदलत्या हवामानात उत्तम शेती करू शकणार आहे.

राज्यात हेक्टरनुसार हरभरा क्षेत्रावर पेरणी

  • ठाणे 2853 
  • पालघर 2387
  • रायगड  916
  • रत्नागिरी 4
  • सिंधुदुर्ग 00
  •  नाशिक 29887
  • धुळे 24933
  • नंदुरबार 15781
  • जळगाव 57964
  • अहमदनगर 80260
  • पुणे 19708
  • सोलापूर 89335
  • सातारा 33258
  • सांगली 20295
  • कोल्हापूर 4723 
  • औरंगाबाद 46553
  • जालना 94444
  • बीड 157649
  • लातूर 309319
  • उस्मानाबाद 228377
  • नांदेड  256320
  • परभणी 164457
  • हिंगोली 114882
  • बुलढाणा 180237
  • अकोला 101759
  • अमरावती 125988
  • वाशिम 13000
  • वर्धा 64414
  • भंडारा 88559
  • गोंदिया 12089
  • चंद्रपूर 49942
  • गडचिरोली 4525
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Navneet Rana : नवनीत राणा हाज़िर हो! ओवैसी बंधूंवरील 15 सेकंदाच्या वक्तव्यावर हैदराबाद न्यायालयाची नोटीस
नवनीत राणा हाज़िर हो! ओवैसी बंधूंवरील 15 सेकंदाच्या वक्तव्यावर हैदराबाद न्यायालयाची नोटीस
Chandrapur Tiger : वाघांची शिकार करणारी बहेलिया टोळी विदर्भात सक्रिय, चार महिन्यात चीनमध्ये 15 वाघांची तस्करी
वाघांची शिकार करणारी बहेलिया टोळी विदर्भात सक्रिय, चार महिन्यात चीनमध्ये 15 वाघांची तस्करी
Video : चित्त्यापेक्षाच्या चपळाईने कांगारू हवेत झेपावला अन् कॅच पकडला; अ‍ॅलेक्स कॅरीनं घेतलेला कॅच 'इंग्रज' बघतच राहिले!
चित्त्यापेक्षाच्या चपळाईने कांगारू हवेत झेपावला अन् कॅच पकडला; अ‍ॅलेक्स कॅरीनं घेतलेला कॅच 'इंग्रज' बघतच राहिले!
उपायुक्तांच्या निवासस्थानातून रोकड आणि डायमंड चोरीला; तलावात युद्धपातळीवर शोधमोहीम, यंत्रणा लागली कामाला
उपायुक्तांच्या निवासस्थानातून रोकड आणि डायमंड चोरीला; तलावात युद्धपातळीवर शोधमोहीम, यंत्रणा लागली कामाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City Sixty | सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha | 9 PM | 22 Feb 2025ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 22 February 2025Suresh Dhas On Mahadev Munde Case : मस्साजोगनंतर सुरेश धसांनी घेतली महादेव मुंडे कुटुंबीयांची भेटABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 22 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navneet Rana : नवनीत राणा हाज़िर हो! ओवैसी बंधूंवरील 15 सेकंदाच्या वक्तव्यावर हैदराबाद न्यायालयाची नोटीस
नवनीत राणा हाज़िर हो! ओवैसी बंधूंवरील 15 सेकंदाच्या वक्तव्यावर हैदराबाद न्यायालयाची नोटीस
Chandrapur Tiger : वाघांची शिकार करणारी बहेलिया टोळी विदर्भात सक्रिय, चार महिन्यात चीनमध्ये 15 वाघांची तस्करी
वाघांची शिकार करणारी बहेलिया टोळी विदर्भात सक्रिय, चार महिन्यात चीनमध्ये 15 वाघांची तस्करी
Video : चित्त्यापेक्षाच्या चपळाईने कांगारू हवेत झेपावला अन् कॅच पकडला; अ‍ॅलेक्स कॅरीनं घेतलेला कॅच 'इंग्रज' बघतच राहिले!
चित्त्यापेक्षाच्या चपळाईने कांगारू हवेत झेपावला अन् कॅच पकडला; अ‍ॅलेक्स कॅरीनं घेतलेला कॅच 'इंग्रज' बघतच राहिले!
उपायुक्तांच्या निवासस्थानातून रोकड आणि डायमंड चोरीला; तलावात युद्धपातळीवर शोधमोहीम, यंत्रणा लागली कामाला
उपायुक्तांच्या निवासस्थानातून रोकड आणि डायमंड चोरीला; तलावात युद्धपातळीवर शोधमोहीम, यंत्रणा लागली कामाला
अरविंद केजरीवालांच्या 'शीशमहल'ची चर्चा, पण भाजपशासित 'या' राज्यात वनसंवर्धनाच्या पैशातून आयफोन, लॅपटॉप, फ्रीज खरेदीची लयलूट; कॅगचे ताशेरे
अरविंद केजरीवालांच्या 'शीशमहल'ची चर्चा, पण भाजपशासित 'या' राज्यात वनसंवर्धनाच्या पैशातून आयफोन, लॅपटॉप, फ्रीज खरेदीची लयलूट; कॅगचे ताशेरे
Telangana SLBC Tunnel Accident : तेलंगणामध्ये निर्माणाधीन बोगद्याच्या 14 किमी आत 3 मीटर भाग कोसळला; 6 ते 8 मजूर अडकल्याची भीती
तेलंगणामध्ये निर्माणाधीन बोगद्याच्या 14 किमी आत 3 मीटर भाग कोसळला; 6 ते 8 मजूर अडकल्याची भीती
Accident News : नगर-मनमाड महामार्गावर विचित्र अपघात, तीन वाहने एकमेकांवर धडकली
नगर-मनमाड महामार्गावर विचित्र अपघात, तीन वाहने एकमेकांवर धडकली
Manoj Jarange : मस्साजोग ग्रामस्थांचा सुरेश धसांना पाठिंबा! मनोज जरांगेंनी डागली तोफ; म्हणाले, 'माझ्यासाठी तो विषय...'
मस्साजोग ग्रामस्थांचा सुरेश धसांना पाठिंबा! मनोज जरांगेंनी डागली तोफ; म्हणाले, 'माझ्यासाठी तो विषय...'
Embed widget