Tomato Price : 200 रुपये किलोनं विकणारं टोमॅटो दोन रुपयांवर, शेतकरी आक्रमक; रस्त्यावर केला 'लाल चिखल'
सध्या राज्यातील टोमॅटो (Tomato) उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी घसरण झाली आहे.
Tomato Price : सध्या राज्यातील टोमॅटो (Tomato) उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी घसरण झाली आहे. 200 रुपये किलोन विक्री होणारे टोमॅटो सध्या दोन रुपयांवर आले आहे. त्यामुळं छत्रपती संभाजीनगरच्या जाधव मंडीमध्ये टोमॅटोला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर ओतून लाल चिखल केला आहे. दर घसरल्यामुळं शेतकरी आक्रमक झाले आहेत.
वांग्यांच्या दरातही घट
दीडशे ते दोनशे रुपये किलोनं विक्री होणारे टोमॅटो सध्या दोन रुपये किलोनं विक्री होत आहे. त्यामुळं शेतकरी आक्रमक झाले आहेत. छत्रपती संभाजी नगरच्या जाधव मंडीमध्ये शेतकऱ्यांना रस्त्यावर टोमॅटो ओतून सरकारचा निषेध केला. टोमॅटोचे दर दोनशे रुपयांवर गेल्यानं शेतकऱ्यांनी टोमॅटोचं पीक घेतलं होतं. त्यासाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला होता. पण आवक वाढल्यानं टोमॅटोच्या दरात घट झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर टाकून त्याचा लाल चिखल केला. केवळ टोमॅटोच नाही तर वांग्यांच्या दरातही घट झाली आहे. त्यामुळं टोमॅटोबरोबर शेतकऱ्यांनी वांगी देखील रस्त्यावर फेकून दिली.
नाशिकच्या पिंपळगांव बाजार समितीत टोमॅटो फेकून निषेध
काही दिवसांपूर्वी टोमॅटोला (Tomato rate) मोठा भाव मिळत होता. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी तर शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात होते. अशातच सद्यस्थितीत टोमॅटोचे भाव कोसळल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. भाव कोसळल्याने नाशिकच्या (Nashik) पिंपळगांव बाजार समितीत टोमॅटो फेकून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. पिंपळगाव बाजार समितीत सुरुवातीला तीन ते चार हजार असा बाजारभाव मिळालेल्या टोमॅटोच्या दरामध्ये अचानक मोठी घसरण झाली. 20 किलोच्या कॅरेटला अवघा 100 ते 170 रुपये दर मिळाला. त्यामुळे बाजार समितीमध्ये (Pimpalgaon Bajar Samiti) टोमॅटो घेऊन आलेले शेतकरी संतप्त झाले. त्यांनी बाजार समिती आवारातच टोमॅटो फेकून रोष व्यक्त केला.
शेतकऱ्यांचं खर्चनही निघणं कठीण
लाखो रुपये खर्चून टोमॅटोचं पीकं (Tomato Crop) घेतले असून, सध्याच्या मिळालेल्या भावात मजुरी सुटणे अवघड असल्यामुळं शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. मधल्या काळात टोमॅटोमुळं शेतकरी लखपती झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर प्रसारित झाल्या होत्या. आता कमी दरामुळे लाखो रुपयांचे भांडवल खर्च झालेल्या टोमॅटो शेतकऱ्यांचा खर्चही निघणं कठीण झालं आहे. आधीच पावसानं दडी मारल्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहे. अशातच शेतमालाला दर नसल्यामुळं शेतकऱ्यांना फटका बसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: