Nashik : आधी टोमॅटो 200 रुपये किलो, आज शंभर ते दीडशे रुपये प्रतिकॅरेट, संतप्त शेतकऱ्यांनी भररस्त्यात फेकले टोमॅटो
Nashik News : दर घसरल्याने नाशिक (Nashik) जिल्ह्यातील पिंपळगाव बाजार समिती परिसरात रस्त्यावर टोमॅटो फेकून निषेध व्यक्त करण्यात आला.
नाशिक : काही दिवसांपूर्वी अवघ्या देशात टोमॅटोची (Tomato) चर्चा होती. देशभरात टोमॅटोच्या दराने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले होते. तर टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान होते. मात्र सद्यस्थितीत टोमॅटोचे दर घसरल्याने शेतकरी (farmers) आक्रमक झाला असून नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बाजार समिती परिसरात रस्त्यावर टोमॅटो फेकून निषेध व्यक्त करण्यात आला. टोमॅटोचे दर घसरल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पिंपळगाव बाजार समिती परिसरात टोमॅटो (Tomato Rate) फेकून देत आपला रोष व्यक्त केला.
काही दिवसांपूर्वी टोमॅटोला (Tomato rate) मोठा भाव मिळत होता. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी तर शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात होते. अशातच सद्यस्थितीत टोमॅटोचे भाव कोसळल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. भाव कोसळल्याने नाशिकच्या (Nashik) पिंपळगांव बाजार समितीत टोमॅटो फेकून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. पिंपळगाव बाजार समितीत सुरुवातीला तीन ते चार हजार असा बाजारभाव मिळालेल्या टोमॅटोच्या दरामध्ये अचानक मोठी घसरण झाली. 20 किलोच्या कॅरेटला अवघा 100 ते 170 रुपये दर मिळाला. त्यामुळे बाजार समितीमध्ये (Pimpalgaon Bajar Samiti) टोमॅटो घेऊन आलेले शेतकरी संतप्त झाले. त्यांनी बाजार समिती आवारातच टोमॅटो फेकून रोष व्यक्त केला.
लाखो रुपये खर्चून टोमॅटोचे पीक (Tomato Crop) घेतले असून, सध्याच्या भावात मजुरी सुटणे अवघड असल्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. मधल्या काळात टोमॅटोमुळे शेतकरी लखपती झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर प्रसारित झाल्या होत्या, आता कमी दरामुळे लाखो रुपयांचे भांडवल खर्च झालेल्या टोमॅटो शेतकऱ्यांना रोडपती बनविण्याचा धोका असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. टोमॅटोच्या भावामध्ये सातत्याने घसरणत होत असल्याने आज निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हेमंत पाटील या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांने टोमॅटो विक्रीला आणले असता यावेळी एका 20 किलोच्या कॅरेटला 100 रुपये, किलोला 5 रुपये भाव पुकारल्याने संतप्त होत शेतकऱ्याने बाजार समितीच्या आवारात टोमॅटो फेकत संताप व्यक्त केला.
टँकरने पाणी भरून शेती जगविली, पण....
'तळ्यातील पाणी संपलं, विहिरीतलं पाणी संपलं, एकीकडं पाऊस नाही, टँकरने पाणी भरून शेती जगविली. आज टोमॅटो पिकाला शंभर ते दीडशे रुपये कॅरेटला भाव आहे. शेतकऱ्यांना कसा परवडणार असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. एक शेतकरी म्हणाला की, पाच लाख रुपये कर्ज काढून अडीच एकरमध्ये एक्स्पोर्ट क्वालिटीचे टोमॅटो पीक घेतले. फक्त शंभर कॅरेट मागे भाव दिला जात आहे. ज्यावेळी भाव होता, त्यावेळी शेतकऱ्यांचे भलं झालं अशी ओरड झाली, लगेच भाव पडले, आता काय करायचं शेतकऱ्यांनी असा सवाल करत एकीकडे प्यायला पाणी नाही, तरीही शेतकरी पिके जगवत आहेत, याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे शेतकरी म्हणाले.
इतर महत्वाची बातमी :
Nashik Tomato Rate: पिंपळगाव बाजार समितीत भाव नसल्याने फेकले टोमॅटो