Oil palm plantation : 11 राज्यांमध्ये 3 हजार 500 हेक्टरवर पाम तेल वृक्षांची लागवड, खाद्यतेल उत्पादन वाढवण्यावर भर
11 राज्यांतील 49 जिल्ह्यांमध्ये पाम तेल लागवडीची (Oil palm plantation) मोहिम राबवण्यात आली. कृषी मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार 3 हजार 500 हेक्टरवर 5 लाखांहून अधिक वृक्षांची लागवड केली आहे.
Oil palm plantation : राष्ट्रीय खाद्यतेल मिशन - ऑइल पाम अंतर्गत 11 राज्यांतील 49 जिल्ह्यांमध्ये पाम तेल लागवडीची (Oil palm plantation) मोहिम राबवण्यात आली. पाम तेल प्रक्रिया कंपन्यांसह राज्य सरकारांनी पाम तेल लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी 'मेगा ऑइल पाम प्लांटेशन ड्राइव्ह' सुरु केले आहे. यामुळं खाद्यतेल उत्पादनात भारत 'आत्मानिर्भर' होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, कृषी मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार 7 हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी सुमारे 3 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर 5 लाखांहून अधिक वृक्षांची लागवड केली आहे.
केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात 25 जुलै 2023 रोजी झाली होती. 12 ऑगस्टला या मोहिमेचा समारोप करण्यात आला. 2025-26 पर्यंत 6.5 लाख हेक्टर क्षेत्रावर पाम तेल लागवड करण्याचे उद्दीष्ट आहे. 11 राज्यांमधील 49 जिल्ह्यांतील 77 गावांमधील 7 हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी पाच लाखाहून अधिक पाम तेलाच्या वृक्षाची लागवड केली आहे. .
या 11 राज्यांमध्ये पाम तेल वृक्षांची लागवड
कृषी मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, गोवा, कर्नाटक, मिझोराम, नागालँड, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा आणि त्रिपुरा या प्रमुख पाम तेल उत्पादक राज्यांमध्ये वऋांची लागवड करण्यात आली आहे. वृक्ष लागवडीच्या संदर्भात वेळोवेळी चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यातून शेतकरी आणि कर्मचाऱ्यांना अधिक जागरूक करणे, वृक्षांचे आरोग्य सुधारणे हे उद्दीष्ट होते. यामुळं उत्पादकता वाढेल आणि शाश्वत उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील.
इंडोनेशिया आणि मलेशियातून भारतात पाम तेलाची आयात
पाम तेलाच्या पिकाला जादुई पीक असं देखील म्हटलं जातं. पाम तेल रोजच्या जवळजवळ प्रत्येक पदार्थात असते. खाद्यपदार्थ, चॉकलेट, आईसक्रीम, ब्रेड, बटर अगदी सौंदर्यप्रसाधनातही त्याचा वापर केला जातो. डिझेल आणि पेट्रोलमध्ये त्याचा बायोइंधन म्हणून वापर करतात. औद्योगिक क्षेत्रातही त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळं देशात पाम तेलाचं उत्पादन वाढवण्यावर भर दिला जात आहे. भारतात खाद्यतेलाच्या एकूण बाजारपेठेपैकी 60 टक्के भाग पाम तेलाने व्यापला आहे. पण भारतात एकूण गरजेच्या फक्त 2.7 टक्के इतकंच पाम तेलाचं उत्पादन होतं. इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांमधून भारतात पाम तेलाची 90 टक्के आयात करण्यात येते. दरम्यान, देशात सुद्धा पाम तलाचे उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 2025-26 पर्यंत 6.5 लाख हेक्टर क्षेत्रावर पाम तेल लागवड करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: