(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kissan GPT : शेतीसंदर्भातील चर्चेसाठी KissanGPT चा AI चॅटबॉट लॉन्च, शेतकऱ्यांना मिळणार योग्य वेळी योग्य सल्ला
Kissan GPT : भारतीय शेतकर्यांना मदत करण्यासाठी KissanGPT नावाचा नवीन AI-चॅटबॉट लॉन्च करण्यात आला आहे.
Kissan GPT : सध्या ChatGPT हे कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial intelligence) तंत्रज्ञान चर्चेत आहे. त्याचा वापर करुन शेती क्षेत्रात काय बदल करता येतील यावरही चर्चा सुरु आहे. मूळ भारतीय, शेतकरी कुटुंबात जन्मलेले, अमेरिकेत शिकलेले एक संगणक शास्त्रज्ञ प्रतीक देसाई (Pratik Desai) यांनी ChatGPT हे सर्वात आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान भारतातील नऊ भाषांमध्ये शेतीविषयक चर्चा करू शकेल, असा एक मदतनीस तयार केला आहे. या माध्यमातून कृषी क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञासोबत संवाद व्हावा, तोही मातृभाषेत अशा स्वरूपात ही सेवा उपलब्ध करुन दिली आहे.
भारतीय शेतकर्यांना मदत करण्यासाठी KissanGPT नावाचा नवीन AI-चॅटबॉट लॉन्च करण्यात आला आहे. भारत एक कृषी पॉवरहाऊस असल्यानं हा AI चॅटबॉट केवळ शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी गेम चेंजर ठरु शकतो. शेतीत येणाऱ्या विविध संकटांचा सामना करण्यास आणि त्यांच्या शेतातून अधिक उत्पादन काढण्यात या तंत्रज्ञानाची मदत मिळणार आहे.
पीक लागवड, सिंचन, कीड नियंत्रण यावर सल्ला मिळणार
KissanGPT हे पीक लागवड, सिंचन, कीड नियंत्रण आणि इतर शेती-संबंधित विषयांवर योग्य वेळी सल्ला देऊ शकते. शेतकरी त्यांच्या स्मार्टफोनद्वारे चॅटबॉटशी संवाद साधू शकतात. यामाध्यमातून शेतकऱ्यांना सहज माहिती उपलब्ध होऊ शकते. प्रतीक देसाई यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेल्या KissanGPT च्या माध्यमातून शेतकरी आणि तज्ज्ञ यांच्यातील अंतर दूर होईल. शेतकऱ्यांना नफा वाढवण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि संसाधने या माध्यमातून मिळतील.
शेतीच्या आव्हानांवर मात करण्यासाठी KissanGPT
KissanGPT ला याआधीच त्याचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांचे म्हणणे आहे की यामुळं त्यांना त्यांच्या पिकांबद्दल चांगले निर्णय घेण्यास आणि त्यांचे उत्पादन वाढवण्यास मदत झाली आहे. KissanGPT हे भारतीय शेतकर्यांना आता एक शक्तिशाली नवीन साधन उपलब्ध आहे. जे त्यांना शेतीच्या आव्हानांवर मात करण्यास आणि त्यांच्या शेतात अधिक यश मिळविण्यास मदत करू शकते. भारतातील शेतकरी अधिकाधिक KissanGPT, AI चॅटबॉट कडे वळत आहेत. जे त्यांचा नफा वाढवण्यासाठी कृषी प्रश्नांना मदत करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. चॅटबॉट शेतकर्यांमध्ये लोकप्रिय होत आहे.
शेतकर्यांना सक्षम बनवण्यासाठी प्रतिक देसाई प्रयत्नशील
भारतीय शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याने येणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी मदत करण्याचे प्रतिक देसाई यांचे ध्येय आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्सची पार्श्वभूमी आणि तंत्रज्ञान आणि ऑपरेशन्स मॅनेजमेंटमध्ये एमबीए असलेले देसाई यांनी आयबीएम, एरिक्सन आणि मोटोरोला मोबिलिटी सारख्या शीर्ष कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम केले आहे. भारतीय शेतकर्यांच्या पिकांना सर्वोत्तम किंमती मिळण्यापासून ते मार्केट पर्याय शोधण्यापर्यंत अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. यावर मात करण्यासाठी तसेच शेतकर्यांना सक्षम बनवण्यासाठी प्रतिक देसाई प्रयत्नशील आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: