कापसाचे दर वाढणार कधी? ऐन दिवाळीत बळीराजा अडचणीत, शासकीय खरेदी केंद्र सुरु न झाल्यानं व्यापाऱ्यांकडून लूट
सध्या राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी (Cotton Farmers) अडचणीत सापडला आहे. कारण कापसाच्या दरात (Cotton Price) मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
![कापसाचे दर वाढणार कधी? ऐन दिवाळीत बळीराजा अडचणीत, शासकीय खरेदी केंद्र सुरु न झाल्यानं व्यापाऱ्यांकडून लूट Agriculture News Fall in the price of cotton the farmers of the state are worried कापसाचे दर वाढणार कधी? ऐन दिवाळीत बळीराजा अडचणीत, शासकीय खरेदी केंद्र सुरु न झाल्यानं व्यापाऱ्यांकडून लूट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/08/9228dd35758e4fb8a0b818d67d2105f41699431556308738_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Agriculture News : सध्या राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी (Cotton Farmers) अडचणीत सापडला आहे. कारण कापसाच्या दरात (Cotton Price) मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. शेतकरी कापसाचे दर वाढण्याच्या प्रतिक्षेत आहेत. कापसाला दर नसल्यामुळं ऐन दिवाळीत राज्यातील बळीराजा अडचणीत सापडला आहे. नंदुरबार जिल्ह्यात एक लाख 25 हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. मात्र, यावर्षी कापसाचे दर वाढले नसून शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा आहे.
कापसाचे दर सहा हजार आठशेच्या आसपास
दिवाळीच्या काळात कापसाचे दर वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. मात्र, कापसाचे दर सहा हजार आठशे ते सहा हजार पाचशेच्या दरम्यान स्थिर असल्यानं कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरात भरुन ठेवला आहे. दिवाळीच्या सणात कापसाला दर नसल्यानं शेतकऱ्यांची दिवाळी अडचणीत जाण्याची चिन्ह दिसत आहेत. तर दुसरीकडे शासनाची शासकीय कापूस खरेदी केंद्र अजूनही सुरू झाली नसल्यानं व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे चित्र ग्रामीण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
कापसाला 10 हजारांचा दर मिळावा ही अपेक्षा
काही भागात कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. कपाशीचे अधिक नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांकडून लवकरात लवकर वेचणी करण्यात आली असून यंदा कपाशीला चांगला भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र दुसरीकडे फक्त सहा हजार आठशे रुपये क्विंटल इतकाच भाव सध्या कपाशीला मिळत असून, उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान कापसाला किमान दहा हजार क्विंटल तरी भाव मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. चांगला भाव मिळाल्यास दिवाळीचा सण साजरा करता येईल, या आशेने शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवला होता. मात्र अद्यापही कापसाच्या भावाबाबत शासनस्तरावरून कुठलाच निर्णय झालेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या:
Dhule News : दिवाळीचा सण तोंडावर, धुळ्यात कापसाच्या दरात घसरण, शेतकऱ्यांमध्ये नाराजी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)