Wheat : आत्तापर्यंत खुल्या बाजारात 18.05 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री, किंमती कमी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न
Wheat : भारतीय अन्न महामंडळाने (Food Corporation of India) खुल्या बाजारात 18.05 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री (Sale of wheat) पूर्ण केली आहे.
Wheat : भारतीय अन्न महामंडळाने (Food Corporation of India) खुल्या बाजारात 18.05 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री (Sale of wheat) पूर्ण केली आहे. देशात गहू आणि पीठाच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकरानं FCI च्या माध्यमातून गव्हाची विक्री सुरु केली आहे. गव्हाचा पुरवठा वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं (Govt) 25 जानेवारीला 30 लाख मेट्रिक टन गहू खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ही विक्री करण्यात आली.
Wheat Price : गव्हाच्या किंमती किंचीत घसरण
केंद्र सरकारच्या सक्रिय प्रयत्नांमुळं देशभरात गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किंमती आता थोड्या कमी झाल्या आहेत. केंद्र सरकार गव्हाच्या उत्पादन आणि विक्रीशी संबंधित सर्व भागधारकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. तसेच, देशाच्या विविध भागांतून मिळालेल्या प्रतिसादानंतर, राखीव किंमती कमी केल्या जात आहेत. भारतीय अन्न महामंडळाने, 23 राज्यांमध्ये 620 ठिकाणी झालेल्या तिसर्या ई-लिलावात 5.07 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री केली आहे. यामध्ये 1 हजार 269 व्यापाऱ्यांना गव्हाची खरेदी केली आहे. खरेदी झालेल्या गव्हापैकी 11 लाख मेट्रिक टन गहू बाजारात आला आहे.
आत्तापर्यंत गहू विक्रीचे तीन लिलाव
गव्हाची ई-लिलावतून होणारी ही खुली विक्री 15 मार्चपर्यंत दर बुधवारी, केली जाणार आहे. ग्राहकांच्या हितांचं रक्षण करण्यासाठी गहू बाजारात उपलब्ध करुन देण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे. एक आणि दोन फेब्रुवारीला झालेल्या पहिल्या लिलावात, 9.13 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री करण्यात आली होती. यामध्ये 1 हजार 16 व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला होता. 2 हजार 474 क्विंटल या सरासरी दराने गव्हाची विक्री करण्यात आली. त्याचप्रमाणे, 15 फेब्रुवारीला झालेल्या दुसऱ्या लिलावात 3.85 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री करण्यात आली. यामध्ये 1 हजार 60 व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला होता. हा गहू 2 हजार 338 क्विंटल दराने विकण्यात आला. बहुतांश बोली लावणाऱ्यांनी 100 ते 500 मेट्रिक टन अशा प्रमाणात गहू खरेदी केला. यामुळं गहू आणि पिठाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यास हातभार लागला आहे.
देशातील गहू आणि पिठाच्या वाढत्या किंमतीवर तोडगा काढण्यासाठी, गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील मंत्री गटाची बैठक झाली होती. या बैठकीत देशातील बफर स्टॉकच्या स्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात देखील झाली होती. वाढत्या किंमतीवर त्वरित नियंत्रणासाठी, गहू बाजारात उतरवण्याच्या पर्यायांना मंत्र्यांच्या समितीने (CoM) मान्यता दिली होती. त्यानुसार 30 लाख मेट्रिक टनाची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आत्तापर्यंत 18.05 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री पूर्ण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: