IPL 2022: 'आरसीबीने मला विचारलेही नाही...' युजवेंद्र चहलच्या भावनांचा फुटला बांध
IPL 2022 : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने आयपीएलमध्ये रॉयल चँलेंजर्स बेंगलोरपासून (RCB - आरसीबी) वेगळं होण्यावर खुलासा केला आहे.
IPL 2022 : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने आयपीएलमध्ये रॉयल चँलेंजर्स बेंगलोरपासून (RCB - आरसीबी) वेगळं होण्यावर खुलासा केला आहे. 31 वर्षीय युजवेंद्र चहल म्हणाला की, ‘आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी आरसीबीने रिटेन करण्यासाठी मला विचारलेही नाही. रिटेन करण्याचा कोणताही प्रस्ताव आरसीबीकडून आला नाही.’ आयपीएल 15 मध्ये दोन नवे संघ दाखल झाले आहेत. त्यामुळे स्पर्धा सुरु होण्याआधी मेगा लिलाव पार पडला. या लिलावाआधी जुन्या आठ संघाना काही खेळाडूंना रिटेन करण्याची संधी दिली होती. आरसीबीने मॅक्सवेल, विराट कोहली आणि मोहम्मद सिराज यांना रिटेन केले. गेल्या अनेक वर्षांपासून खेळणाऱ्या चहलला रिलीज करण्यात आले होते. रिटेन करण्याबाबत कोणताही प्रत्साव आला नव्हता, असा खुलासा चहलने केला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत यजुवेंद्र चहल याने खुलासा केला आहे. तो म्हणाला की, ‘आरसीबीचे माइक हेसन यांनी निलामीआधी तीन खेळाडूंना रिटेन करणार असल्याची योजना सुरु असल्याचं सांगितलं होतं.’ आरसीबी आणि माझ्यामध्ये रिटेशनबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही, असेही चहल म्हणाला. आरसीबीसोबत मी भानात्मकरित्या जोडला गेलो आहे. इतर संघाकडून खेळेल असे कधीही वाटलं नव्हतं. इतके पैसे का मागितले? असे, चाहत्यांनी सोशल मीडियावरही विचारलं. पण खरे तर मायक हेसन यांनी मला फोन करुन तीन रिटेशन (विराट, मॅक्सवेल, मोहम्मद सिराज) असल्याचं सांगितले.
मायक हेसन यांनी मला रिटेन होणार आहे की नाही? किंवा रिटेन करणार आहे की नाही? याबाबत काहीही सांगितले नाही. त्यांनी फक्त तीन रिटेशनबद्दल सांगितले. रिटेशनबद्दल बोलणं झाल्यानंतर लिलावात माझ्यावर बोली लावू असे सांगितलं, असे चहल म्हणाला.
आठ वर्ष आरसीबीकडून खेळला चहल –
युजवेंद्र चहलने तब्बल आठ वर्ष आरसीबीकडून खेळला आहे. नुकत्याच झालेल्या लिलावात राजस्थान रॉयल्सने चहलला 6.50 कोटी रुपयात खरेदी केले.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live