(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aaron Finch Retires: टी-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! आरोन फिंच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त
Aaron Finch Retirement: ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी होणाऱ्या (11 सप्टेंबर) तिसऱ्या एकदिवसीय सामना आरोन फिंचच्या एकदिवसीय कारकिर्दीतील अखेरचा सामना असेल.
Aaron Finch Retirement: ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार आरोन फिंचनं (Aaron Finch) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी होणाऱ्या (11 सप्टेंबर) तिसऱ्या एकदिवसीय सामना आरोन फिंचच्या एकदिवसीय कारकिर्दीतील अखेरचा सामना असेल. आरोन फिंचला दिर्घकाळापासून खराब फॉर्मचा सामना करत आहे. त्याला मागच्या 7 डावात फक्त 26 धावा करता आल्या. फिंचनं एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आगामी टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे.
आरोन फिंचनं 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आरोन फिंचनं त्याच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 145 सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाचं प्रतिनिधित्व केलंय. ज्यात त्यानं 39.14 च्या सरासरीनं 5 हजार 401 धावा केल्या आहेत. ज्यात 17 शतकांचा सामावेश आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग, मार्क वॉ आणि डेविड वॉर्नर यांच्यानंतर ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक शतक झळकावणारा फलंदाजही आहे. ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये रिक पॉन्टिंगनं सर्वाधिक 29 वेळा शतक ठोकलं आहे. तर, डेव्हिड वार्नर आणि मार्क वॉ यांच्या नावावर प्रत्येकी 18-18 शतकांची नोंद आहे. फिंच रविवारी केर्न्समधील काजलिस स्टेडियमवर त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 146 वा आणि अखेरचा एकदिवसीय सामना खेळणार आहे. तर, कर्णधार म्हणून हा त्याचा 54 वा एकदिवसीय सामना असेल.
आरोन फिंच काय म्हणाला?
"काही अविश्वसनीय आठवणींसह हा एक अद्भुत प्रवास आहे. काही अद्भूत एकदिवसीय संघांचा भाग होण्यासाठी मी खूप भाग्यवान आहे. त्याचप्रमाणे, मी खेळलेल्या प्रत्येकासह अनेक लोकांचा मला आशीर्वाद मिळाला आहे. माझ्या इथपर्यंतच्या प्रवासात ज्यांनी मला मदत केली आणि साथ दिली. मी सर्वांचे आभार मानतो."
ऑस्ट्रेलियाचा नवा कर्णधार कोण?
तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंडचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलाय. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात न्यूझीलंडच्या संघाला नमवून ऑस्ट्रेलियानं 2-0 अशी आघाडी घेतलीय. या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना 11 सप्टेंबर रोजी केर्न्समधील काजलिस स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ नव्या कर्णधाराची घोषणा करू शकते. आरोन फिंचनंतर स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल आणि पॅट कमिंन्स ऑस्ट्रेलिच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधाराच्या शर्यतीत आहेत.
हे देखील वाचा-