(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज ठाकरेंसमोर मराठ्यांचं आंदोलन, मनोज जरांगे म्हणाले, राज्यात कुठेही आंदोलन नाही, ज्यांना बरळायचंय त्यांना बरळू द्या!
सत्तेत जाण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. राजकारणात गेला म्हणून आम्हाला नावं ठेवायची नाही. आमच्या हक्काचं ओबीसीमधील आरक्षण आम्हाला द्या, असे मनोज जरांहे म्हणाले.
मुंबई : महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले राज ठाकरे धाराशिवमध्ये एका हॉटेलमध्ये मुक्कामी थांबले. यावेळी मराठा आंदोलकांचे (Maratha Resrvation) शिष्टमंडळ राज ठाकरे (Raj Thackeray) यांना भेटण्यास आले. त्यानंतर थोडा गोंधळ झाला, या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक राज ठाकरे यांनी मराठ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. राज्यात कुठेही आपले आंदोलन नाही. त्यामुळे आंदोलन आपण करायचं नाही. संयम धरा मुद्दाम उचकवण्याचे काम राज्यात सुरू आहे. कोणीही आंदोलन करू नका ज्याला बराळायचा आहे त्याला बरळू द्या, असे मनोज जरांगे म्हणाले. ते अमरावतीत माध्यमांशी बोलत होते.
मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजाला माझी विनंती आहे की आपल्या राज्यात कुठेही आंदोलन नाही. त्यामुळे आंदोलन आपण करायचं नाही. आपण संयम धरा, मुद्दाम आपल्याला उचकवण्याचे काम राज्यात सुरू आहे. सर्वजण स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी माझ्यावर तुटून पडले आहेत. हे त्यांचे षडयंत्र आहे अभियान नावाचा त्याला शब्द दिला आहे. आपण संयम धरा काहीही कोणाला अडवायची गरज नाही, कोणाविरोधात आंदोलन करायची गरज नाही. राज्यात कुठेही समाजाचा आंदोलन सुरू नाही कोणीही आंदोलन करू नका ज्याला बराळायचा आहे त्याला बरळू द्या. विधानसभेनंतर सत्ताच मराठ्यांची येणार आहे तेव्हा सत्ता पलटलेली असेल.
राजकारण्यांना पायाखाली तुडवण्याची योग्य वेळ : मनोज जरांगे
सगळ्यात पक्षाच्या मराठा आमदारांनी त्यांना समजून सांगणं आवश्यक आहे की, आमच्या हक्काचं ओबीसी मधला आरक्षण आम्हाला द्या. सतेत्त जाण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. आम्हाला नाव ठेवायचे नाहीत. तुम्ही राजकारणात गेलात म्हणून गोरगरिबांची लाट आली सामान्यांची लाट आली . सर्व जाती धर्माच्या लोकांना वाटत आहे की, ही एवढीच वेळ आहे सत्तेत जाण्याची... राजकारण्यांना पायाखाली तुडवण्याची योग्य वेळ आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.
फडणवीस चुकीचे करत आहे: मनोज जरांगे
मनोज जरांगे म्हणाले, फडणवीस साहेब जे करत आहे ते चुकीचे करत आहेत. माझ्या विरोधात बोलायला लावलं जात आहे . मराठ्यांचा आमदारांचा नाईलाज झाला आहे, त्यांना बोलायला भाग पाडला आहे. मराठ्यांना मराठ्यांच्या अंगावर घालायला लावत आहेत. येवलेवाला शांत बसला आहे याचा अर्थ फडणवीस यांनी एक बैठक घेतली होती. बहुतेक छगन भुजबळ यांना शांत राहण्याचे सांगितलं आहे. फडणवीस यांनी मराठ्यांच्या विरोधात मिशन आणि अभियान सुरू केला आहे त्यात ते फसणार आहेत.
शेवटचा निर्णय 29 ऑगस्टला : मनोज जरांगे
कागदपत्र काढून ठेवा लढायचं म्हटलं तर आपण तयारी पाहिजे. 14 ते 20 ऑगस्ट दरम्यान 288 विधानसभेचा आढावा घेणार फायनल निर्णय 29 ऑगस्टला होणार आहे. 288 मधील एससी एसटीच्या जागा सुटलेल्या आहेत त्याचाही विचार करणार आहे. इतर छोट्या छोट्या जातीचे आमदार होण्याची सुद्धा या काळात दाट शक्यता आहे. खूप सिट निघू शकतात . आपलं अपक्षच बरं आहे यांना सर्व लोक कदरलेले आहेत,आघाड्या नकोच, असेही जरांगे म्हणाले.
Manoj Jarange Video : सत्तेत जाण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही : मनोज जरांगे
हे ही वाचा :
जरांगेंचं उपोषण खुर्चीसाठी, उपोषण करायला बारामतीहून सांगितलं होतं का? अजय बारस्करांचा सवाल