एक्स्प्लोर
ICC T20 WC 2021 : यंदा विश्वचषकात नाणेफेक किती महत्त्वाचं ? युएईतल्या खेळपट्ट्या नेमक्या आहेत कशा ?
युएईतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात नाणेफेक निर्णायक ठरत असल्याचं वारंवार दिसून येत आहे. या विश्वचषकातल्या डे-नाईट सामन्यात नाणेफेक जिंकणारा कर्णधार पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारतो. कारण उत्तरार्धात दव पडत असल्यामुळं त्या वेळी गोलंदाजांना त्या दवाचा त्रास होतो. भारताला सलामीच्या सामन्यात पाकिस्तानकडून स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाचं एक कारण नाणेफेक हरणं आणि उत्तरार्धात गोलंदाजी करावी लागणं हेही होतं. त्याच पार्श्वभूमीवर क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांच्याकडून समजून घेऊया की, युएईत नाणेफेक निर्णायक का ठरते?
आणखी पाहा























