(Source: ECI/ABP News/ABP Majha)
TOKYO Paralympic 2020 मध्ये भारताच्या खात्यात पाच पदकांची कमाई , भारतीय खेळाडूंची उत्तम कामगिरी
Avani Lekhara wins Gold : टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताची नेमबाज अवनी लेखरा हिची सुवर्ण कामगिरी पाहायला मिळत आहे. 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत अवनी लेखराला सुवर्ण पदक मिळालं आहे. दरम्यान, अवनी लेखरानं क्वॉलिफिकेश राउंडमध्ये सातवं स्थान पटकावलं होतं. अवनीनं यासोबतच आणखी एक इतिहास रचला आहे. पॅरालिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी अवनी ही पहिली खेळाडू ठरली आहे.
Tokyo Paralympics 2020 : भारतीय भालाफेकपटू सुमित अंतिलने सोमवारी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. पहिल्यांदा पॅरालिम्पिकमध्ये खेळताना सुमितने भाला फेकण्याच्या F-64 स्पर्धेच्या दुसऱ्या प्रयत्नात 68.08 मीटरचा थ्रो केला. त्यानंतर त्याने आपल्या पाचव्या प्रयत्नात त्यात आणखी सुधारणा केली आणि 68.55 मीटर भाला फेकून विश्वविक्रम केला.
Paralympic 2020 : टोकियो पॅरालिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी इतिहास रचला आहे. देवेंद्र झाझरियानं रौप्यपदक तर सुंदर गुजरनं कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं आहे. त्यामुळे आलाफेकमध्ये भारतीय खेळाडूंच्या खात्यात आणखी दोन पदकांची भर पडली आहे. यासोबतच भारतानं आतापर्यंत पॅरालिम्पिकमध्ये 7 पदकांची कमाई केली आहे.
Tokyo Paralympics : टोकियोमध्ये सुरु असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये भारताची आजची सुरुवात जबरदस्त झाली आहे. आज अवनी लेखरानं सुवर्णपदक जिंकल्यानंतर योगेश कठुनियानं (Yogesh Kathuniya wins silver medal in Tokyo Paralympics) थाळीफेकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून दिलं आहे. योगेशनं 44.38 मीटर थाळीफेक करत पदकावर शिक्कामोर्तब केलं. त्याआधी भारताच्या अवनी लेखरानं 1 मीटर्स एअर रायफल्समध्ये सुवर्ण वेध घेत भारताला सुवर्णपदक जिंकून देत आजच्या दिवसाची शानदार सुरुवात करुन दिली होती.