एक्स्प्लोर
IPL 2022 : आयपीएलची रंगत आणखी वाढणार, पुढील हंगामात 'हे' दोन नवे संघ देणार धडक, नावे घ्या जाणून
IPL 2022: क्रिकेटमध्ये टी-20 फॉरमॅट आल्यानंतर क्रिकेटचे रंगरूप बदलले आहे. यात आयपीएलने आणखी भर घातली आहे. आयपीएल गेल्या 14 वर्षात खूप गाजली असून क्रिकेट चाहत्यांनीही या लीगला भरभरून प्रेम दिले. क्रिकेटप्रेमींच्या मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आयपीएलने देखील वेगवेगळ्या हंगामात नवनवीन बदल केले. दरम्यान, आयपीएलच्या पुढच्या हंगामात 8 नव्हेतर, 10 संघ खेळणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली होती. यामुळे हे दोन संघ नेमके कोणते आहेत? याची क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागली होती. मात्र, चाहत्यांची प्रतिक्षा आता संपली असून पुढील हंगामात दाखल होणाऱ्या नव्या दोन संघाची नावे समोर आली आहेत.
आणखी पाहा


















