Argentina Vs Croatia FIFA World Cup 2022 Semifinal : सेमीफायनलमध्ये अर्जेंटिनाकडून क्रोएशियाचा पराभव
FIFA World Cup Argentina vs Croatia: लिओनेल मेस्सीच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या अर्जेंटिनाच्या (Argentina) फुटबॉल संघानं फिफा विश्वचषक 2022 च्या (FIFA World Cup 2022) फायनल्समध्ये धडक दिली आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या विश्वचषकाच्या सेमीफायनल्समध्ये मंगळवारी रात्री उशिरा अर्जेंटिनानं क्रोएशियाचा (Croatia) 3-0 असा पराभव केला. अर्जेंटिनानं 2014 नंतर पहिल्यांदाच फिफाची फायनल गाठली आहे. आता अर्जेंटिना यंदाच्या विश्वचषकावर आपलं नाव कोरणारण्यात यशस्वी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सेमीफायनल्सचा दुसरा सामना फ्रान्स आणि मोरोक्को यांच्यात होणार आहे. विजेतेपदासाठी फायनल्समध्ये अर्जेंटिनाची लढत सेमीफायनल्सच्या दुसऱ्या सामन्यातील विजेता संघ फ्रान्स किंवा मोरोक्कोशी यांच्यात खेळवण्यात येईल. तर यंदाच्या फिफा विश्वचषकाची फायनल्स 18 डिसेंबर रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी खेळवण्यात येईल. दिग्गज फुटबॉलर लिओनेल मेस्सीचा विश्वचषकातील हा 26वा सामना असेल. मेस्सीनं फिफाचा सेमीफायनलचा सामना खेळून एक अनोखा विक्रम केला आहे. तो विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू बनला आहे.