Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
Maharashtra Assembly Election 2024: शरद पवार यांनी वयाच्या 84व्या वर्षी प्रचाराची जी धडाडी दाखवली आहे, त्याचे अनेकांकडून कौतुक होत आहे.
मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. तत्पूर्वी सोमवारी निवडणुकीच्या प्रचार मोहीमेची सांगता झाली. गेल्या 20 दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय नेत्यांच्या सभा, रॅली, रोड शो आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय धुरळा उडाला होता. काल संध्याकाळी सहा वाजता प्रचाराची मुदत संपल्याने हा धुरळा खाली बसला आहे. विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhasabha Election 2024) प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामती मतदारसंघ पुन्हा एकदा आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला. अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी बारामतीमध्ये सांगता सभा घेऊन आपापल्या प्रचार मोहिमांचा शेवट केला.
विधानसभा निवडणुकीच्या संपूर्ण प्रचारात शरद पवार यांनी स्वत:ला केंद्रस्थानी ठेवण्यात यश मिळवले. इतर कोणत्याही नेत्यांपेक्षा शरद पवार यांची बहुतांश भाषणं ही चर्चेचा विषय ठरली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी, 'मी महाराष्ट्रात फिरुन पुन्हा पक्ष बांधेन', असे वक्तव्य केले होते. हे विधान शरद पवार यांनी लोकसभा आणि त्यानंतर आताच्या विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्षात उतरुन दाखवले. 84 वर्षांचे शरद पवार यांनी राज्यभरात फिरुन राजकीय वातावरण अक्षरश: ढवळून काढले. 'गद्दारांना साधसुधं नाही, तर जोरात पाडा, महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे', असे शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. राज्यातील अन्य नेत्यांच्या तुलनेत शरद पवार यांनी घेतलेल्या सभा चर्चेचा विषय ठरत आहेत. शरद पवार यांनी दिवाळीत 1 नोव्हेंबरला प्रचार मोहीमेचा शुभारंभ केला होता. या मोहीमेची 18 नोव्हेंबरला म्हणजे काल सांगता झाली. या काळात शरद पवार यांनी थोड्याथोडक्या नव्हे तर 69 जाहीर सभा आणि 3 पत्रकार परिषदा घेतल्या. याचा शरद पवार गटाला किती फायदा होणार, हे आता येणार्या 23 तारखेला स्पष्ट होईल.
शरद पवारांचा महाराष्ट्रातील दौरा कसा होता?
०१-११-२४ - बारामती निवासस्थान कार्यकर्ता संवाद मेळावा
०२-११-२४ - पत्रकार परिषद, बारामती
३-११-२४ - पडस्थळ इंदापूर कार्यकर्ता मेळावा
०४-११-२४ - पत्रकार परिषद, मुंबई
०५-११-२४ - दिवाळी निमित्त गावभेट दौरा चौधरवाडी सभा, बारामती
०५-११-२४ - जाहीर सभा शिर्सुफळ , बारामती
०५-११-२४ - जाहीर सभा सुपा, बारामती
०५-११-२४ - जाहीर सभा मोरगाव, बारामती
०५-११-२४ - जाहीर सभा, सोमेश्वर, बारामती
०५-११-२४ - पक्ष प्रवेश सोहळा, बारामती
०५-११-२४ - व्यापारी मेळावा, बारामती
०५-११-२४ - वकील संघटना मेळावा, बारामती
०६-११-२४ - महाविकास आघाडी जाहीर, सभा मुंबई
०७-११-२४ - जाहीर सभा, नागपूर पूर्व
०७-११-२४ - जाहीर सभा, तिरोडा, गोंदिया
०७-११-२४ - जाहीर सभा, काटोल, नागपूर
०८-११-२४ - जाहीर सभा, हिंगणघाट, वर्धा
०८-११-२४ - जाहीर सभा, जिंतूर, परभणी
०८-११-२४ - जाहीर सभा, वसमत, हिंगोली
०९-११-२४ - जाहीर सभा, उदगीर, लातूर
०९-११-२४ - जाहीर सभा, परळी, बीड
०९-११-२४ - जाहीर सभा, आष्टी, बीड
०९-११-२४ - जाहीर सभा, बीड
१०-११-२४ - जाहीर सभा, भूम-परंडा, धाराशिव
१०-११-२४ - जाहीर सभा, शेवगाव, अहिल्यानगर
१०-११-२४ - जाहीर सभा, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर
१०-११-२४ - जाहीर सभा, घणसांगवी, जालना
११-११-२४ - जाहीर सभा, पारोळा, जळगाव
११-११-२४ - जाहीर सभा, सिंदखेडा, धुळे
११-११-२४- जाहीर सभा, जामनेर, जळगाव
११-११-२४ - जाहीर सभा, मुक्ताईनगर, जळगाव
११-११-२४ - जाहीर सभा, धरणगाव, जळगाव
१२-११-२४ - पत्रकार परिषद, जळगाव
१२-११-२४ - जाहीर सभा, कळवण, नाशिक
१२-११-२४ - जाहीर सभा, दिंडोरी, नाशिक
१२-११-२४ - जाहीर सभा, निफाड, नाशिक
१२-११-२४ - जाहीर सभा, येवला, नाशिक
१२-११-२४ - जाहीर सभा, कोपरगाव, अहमदनगर
१२-११-२४ - जाहीर सभा, आडगाव, नाशिक
१३-११-२४ - जाहीर सभा, सिन्नर, नाशिक
१३-११-२४ - जाहीर सभा, राहाता, अहमदनगर
१३-११-२४ - जाहीर सभा, राहुरी, अहमदनगर
१३-११-२४ - जाहीर सभा, ओतूर, जुन्नर, पुणे
१३-११-२४ - जाहीर सभा, मंचर, आंबेगाव, पुणे
१३-११-२४ - जाहीर सभा, खेड, पुणे
१३-११-२४ - जाहीर सभा, भोसरी, पुणे
१४-११-२४ - चिंचवड रॅली, जाहीर सभा
१४-११-२४ - जाहीर सभा, शिरूर, पुणे
१४-११-२४ - जाहीर सभा, धनकवडी, पुणे
१४-११-२४ - जाहीर सभा, वानवडी, पुणे
१४-११-२४ - जाहीर सभा, हडपसर, पुणे
१५-११-२४ - जाहीर सभा, तासगाव, सांगली
१५-११-२५ - जाहीर सभा, इचलकरंजी, कोल्हापूर
१५-११-२४ - जाहीर सभा, चंदगड,, कोल्हापूर
१५-११-२४ - जाहीर सभा, गडहिंग्लज, कोल्हापूर
१५-११-२४ - जाहीर सभा, कराड उत्तर
१६-११-२४ - पत्रकार परिषद, सातारा
१६-११-२४ - जाहीर सभा, रायगड
१६-११-२४ - जाहीर सभा, वाई, सातारा
१६-११-२४ - जाहीर सभा, कोरेगाव, सातारा
१६-११-२४ - जाहीर सभा, माण, सातारा
१६-११-२४ - जाहीर सभा, फलटण, सातारा
१७-११-२४ - जाहीर सभा, करमाळा, सोलापूर
१७-११-२४ - जाहीर सभा, माढा, सोलापूर
१७-११-२४ - जाहीर सभा, पुरंदर, पुणे
१७-११-२४ - जाहीर सभा, इंदापूर, पुणे
१७-११-२४ - जाहीर सभा, दौंड, पुणे
१८-११-२४ - जाहीर सभा, भोर, पुणे
१८-११-२४- जाहीर सभा, कर्जत, अहिल्यानगर
१८-११-२४ - जाहीर सभा, इंदापूर, पुणे
१८-११-२४ - जाहीर सभा, बारामती, पुणे
69- जाहीर सभा/मेळावे.
3 - पत्रकार परिषद
भाजप नेत्यांच्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठीच्या सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी - 10 सभा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह - 15 सभा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी - 72 सभा + रोड शो
उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ - 11 सभा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - 64 सभा + रोड शो
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे - 27 सभा
आणखी वाचा