![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
IND vs SA Match :रोहित शर्माच्या भारतीय संघाचा विश्वचषकातला विजयरथ कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर दाखल
रोहित शर्माच्या भारतीय संघाचा विश्वचषकातला विजयरथ कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर दाखल झाला आहे. भारताचा विश्वचषकातला आठवा साखळी सामना हा उद्या तुल्यबळ दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ विश्वचषकात जबरदस्त फॉर्मात आहेत. भारताचं उपांत्य फेरीचं तिकीट कन्फर्म झालं असलं तरी, विश्वचषकाच्या गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवण्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये मोठी चुरस आहे. या गुणतालिकेत भारतानं सातपैकी सात सामने जिंकून, सर्वाधिक १४ गुणांसह सध्या पहिलं स्थान पटकावलं आहे. दक्षिण आफ्रिकेनं सातपैकी सहा सामने जिंकून, १२ गुणांसह दुसरं स्थान राखलं आहे. पण भारताच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट किंचित सरस आहे. त्यामुळं भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधला साखळी सामना हा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट करणारा ठरण्याची शक्यता आहे.
![Saurabh Netravalkar : अमेरिकेची ट्वेन्टी 20 विश्वचषकाच्या सुपर एटमध्ये धडक! तयारी कशी?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/15/9433203a811be984384f45a8bbbe9b391718465002860977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Sunandan Lele on T20 : ट्वेन्टी 20 विश्वचषकावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास पाकिस्तानला फटका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/b444b599746d6b9f43246771ac24a7c31718376237518977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![T 20 World Cup : भारतीय संघाचा सामना यजमान अमेरिकेसोबत, क्रिकेट समीक्षक सुनंदन लेलेंचा रिपोर्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/e090d83d00be770aa8521f74bfbd5df41718159478247327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Amol Kale Death : एमसीए अध्यक्ष अमोल काळेंचं निधन; सुनंदन लेलेंचा न्यूयॉर्कमधून रिपोर्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/10/f90a55d589759fc26bdce2b0a83718f2171804366417590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Amol Kale Death : MCA चे अध्यक्ष अमोल काळे यांचं निधन, न्यूयॉर्कमध्ये हार्टअटॅक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/10/52d1dfe8a3c64b0e382daadcbd581dfd171803276084190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)