एक्स्प्लोर

स्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : शहर नेमकं कसं पेटत गेलं?

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये दोन गटात झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शहरातल्या काही कंपन्यांची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. तर 15 ते 16 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिली. सध्या औरंगाबाद पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

शहरात काल झालेल्या वादात दोघांचा मृत्यू झाला असून 30 ते 40 जण जखमी झाल्याची माहिती आहे. शिवाय, औरंगाबाद पोलिसांच्या तीन गाड्या जाळण्यात आल्या. तर सहाय्यक पोलीस आयुक्तांसह दहा पोलीस जखमी झाले आहेत. मात्र या प्रकरणाची नेमकी ठिणगी पडली कुठे, याबाबत अनेक दावे केले जात आहेत.

औरंगाबादमध्ये काय झालंरात्री 10 वाजता

औरंगाबादमधल्या जाळपोळीची पहिली ठिणगी गांधीनगर आणि मोतीकारंजामध्ये पडली. क्षुल्लक कारणावरुन तरुणांमध्ये हाणामारी सुरु झाली आणि त्याला सोशल मीडियाने हवा दिली.

रात्री 11 वाजता

गांधीनगरात सुरु झालेला वाद सोशल मीडियामुळे पसरत गेला. शहागंज भागात दोन गट समोरासमोर आले. एकमेकांवर दगडफेक सुरु झाली. घरासमोरच्या गाड्या पेटवण्यात आल्या. यावेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पण तोपर्यंत शहागंज पेटलं होतं.

मध्यरात्री 2 वाजता

आतापर्यंत या दंगलीचं लोण गांधी पुतळा, लोटाकारंजा, नवाबपुरा या भागापर्यंत पोहोचलं होतं. निजामुद्दीन चौकात जाळपोळ सुरु झाली. चिंचोळ्या गल्ल्यांच्या या भागात आग भडकत गेली आणि दुकाने जळाली.

पहाटे 3 वाजता

या दंगलीला नियंत्रणात आणण्यासाठी अखेर पोलिसांना कठोर व्हावं लागलं. सुरुवातीला पोलिसांनी लाठीमार सुरु केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. प्लॅस्टिक बुलेटने फायरिंग केलं. यात 17 वर्षांचा मुलगा जखमी झाला. जखमी झालेल्या तरुणांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

पहाटे 4 वाजता

पण तितक्यात निजामुद्दीन चौकातल्या विजेच्या ट्रान्सफॉर्मरला आग लागली आणि सगळीकडे अंधार पसरला. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईत अडथळा निर्माण झाला. पुढचा तासभर गांधीनगर, निजामुद्दीन चौक, मोतीकारंजा चेलिपुरा, मंजूरपुरा, शहागंज भागात जाळपोळ सुरु झाली.

सकाळी 8 वाजता

दिवस उजाडताच जाळपोळ आटोक्यात आली. दिवसा उजेडी सारं काही शांत होईल असं वाटत असतानाच राजाबाजारमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला. कारण इथे अज्ञातांनी एका दुकानावर पेट्रोलच्या बाटल्या फेकल्या.

दुपारी 12 वाजता

दुपारी बारा वाजेपर्यंत परिस्थिती आटोक्यात आली. पण चंपा चौक आणि रोशन गेट भागात मात्र आग धुमसतच होती. अवघ्या 14 तासांमध्ये क्षुल्लक कारणावरुन दोन जण दगावले, 51 जण जखमी झाले, 100 दुकानं फुटली, अनेक दुचाकी आणि चारचाकी जाळल्या, तर दोन घरं कोसळली. फक्त एका किरकोळ घटनेपायी...

औरंगाबाद पेटण्यामागचं नेमकं कारण काय?

औरंगाबाद का धुमसलं यामागे प्रत्येकाकडून वेगवेगळं कारण सांगितलं जात आहे. प्रत्येकाने वेगवेगळा दावा केला आहे.

या दंगलीचं पहिलं कारण हे शहागंज भागातून समोर येतंय. सरदार वल्लभभाईंचा पुतळा आणि या ऐतिहासिक पुतळ्याच्या नुतनीकरणासाठी तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पण त्यासाठी इथे असलेल्या पानाच्या टपऱ्या हलवण्याची आवश्यकता होती. तसे आदेशही निघाले आणि यावरुनच वादाला तोंड फुटलं आणि त्याला धार्मिक रंग मिळाला, असाही दावा आहे.

शहागंज भागातल्या बाजारपेठेत काही हातगाडीवाले हे व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर गाड्या लावतात. त्यामुळे दुकानदारांचा त्यांचावर रोष होता. दुकानदारांनी स्थानिक नगरसेवक लच्छू पहिलवान यांच्याकडे दादही मागितली होती. त्यानुसार लच्छू पहिलवान यांनी या फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी पालिकेकडे केली. याच वादातून ही जाळपोळ झाल्याचा दावा केला जात आहे.

महापालिकेच्या पाण्याच्या कनेक्शनवरुन मोतीकारंजा भागात दोन गटात हाणामारी झाली. त्याच हाणामारीने उग्र रुप धारण केलं आणि मग भडका उडाला, असाही काहींचा दावा आहे.

चौथी थिअरी तर भयंकर आहे. काही दिवसांपूर्वी शहागंज भागात एका व्यक्तीने आंबे खरेदी केले. त्यातले अनेक आंबे खराब निघाले. तेच आंबे बदलून घेण्यासाठी तो विक्रेत्याकडे गेला. विक्रेत्याशी त्याची बाचाबाची झाली आणि त्याच फळांच्या गाड्या हटवण्याची मागणी सुरु झाली आणि त्यातूनच दंगल उसळली, असंही सांगितलं जातंय.

आता त्यात आणखी एका थिअरीची भर घातली ती शिवसेनेने. औरंगाबादमधल्या एका दंगलग्रस्त भागात एका महिलेची छेड काढण्यात आली. त्यावरुन वादाला तोंड फुटलं आणि दोन समुदायाचे लोक एकमेकांवर धावून गेले, असा दावा करण्यात आला.

दंगल झाल्यानंतर अफवा पसरवू नका असं खुद्द सरकार आणि पोलीस सांगतात. पण औरंगाबादमधल्या या जाळपोळीमागे वेगवेगळी कारणं सांगून हवा नेमकी कोण देतंय, हा मोठा प्रश्न आहे.

बातम्या व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?
Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
Embed widget