Pakistan Imran Khan: इम्रान खान उद्याच राजीनामा देणार? ABP Majha
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान उद्या इस्लामाबादमध्ये राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. इमरान खान यांच्यावर पक्षासाठी परदेशातून पैसा गोळा करून स्वतःसाठी वापरल्याचा आरोप आहे. यासाठी सोमवारी त्यांना अटक केली जाऊ शकते असे म्हटले जात आहे. खरे तर शुक्रवारीच इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात येणार होता, पण संसदेचे कामकाज लवकर संपल्याने अविश्वास प्रस्ताव मांडला गेला नाही. आता ४ एप्रिल रोजी अविश्वास प्रस्ताव मांडला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच इम्रान खान यांनी रविवारी इस्लामाबादमध्ये त्यांनी एका रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीत इम्रान खान राजीनामा देऊन निवडणुकांची घोषणा करू शकतात असे म्हटले जात आहे..



















