एक्स्प्लोर
Lee Jae-myung : टक्कल बनला निवडणुकीचा मुद्दा, केसगळतीवर धोरण आखण्याचं आश्वासन
South Korea : दक्षिण कोरियात राष्ट्राध्यक्ष निवडीच्या निवडणुकीत केसगळती हा महत्वाचा मुद्दा बनलाय.या निवडणुकीतील उमेदवार ली जे म्यूंग यांनी केसगळती रोखण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज बोलून दाखवलेय. तसंच निवडून आल्यास केसगळतीवरील उपचार हे राष्ट्रीय आरोग्य विमा कार्यक्रमात समाविष्ट करून दाखवण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवलाय. दक्षिण कोरीया म्हटलं की अणूसज्जता, अमेरिकेसोबत संबंध, उत्तर कोरियाशी भांडण असे अनेक मुद्दे असतात पण यावेळी मात्र या सगळ्या मुद्द्यांवर केसगळती आणि डोक्यावरचं टक्कल या मुद्द्यांनी मात केलेली दिसतेय.
आणखी पाहा























