एक्स्प्लोर
Iraq : इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल कदीमी यांच्या हत्येचा कट? निवासस्थानावर झाला ड्रोन हल्ला
इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल कदीमी यांच्या बगदाद येथील निवासस्थानावर ड्रोन हल्ला झाला आहे. या हल्ल्यात पंतप्रधान मुस्तफा अल कदीमी थोडक्यात बचवले आहेत. या हल्ल्यानंतर आपण सुरक्षित असल्याचं ट्वीट त्यांनी केलं आहे. दरम्यान हा पंतप्रधानांच्या हत्येचा कट असल्याची प्रतिक्रिया इराकच्या लष्कराने दिली आहे. तर, या ड्रोन हल्ल्यात काही जण जखमी झाल्याचं वृत्त अल अरबिया या वृत्तवाहिनीनं दिलं आहे. हा ड्रोन हल्ला कुणी केला याबात कोणतीही ठोस माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही. मात्र इराकच्या नागरिकांनी शांतता राखावी, असं अवाहन पंतप्रधानांनी तेथील जनतेला केलं आहे.
आणखी पाहा























