एक्स्प्लोर

Aiadmk Leader CV Shanmugam On Nayanthara: 'मला नयनतारा हवीय...', सर्वांदेखत टीका करताना खासदाराची जीभ घसरली, सुपरस्टार अभिनेत्रीबाबत 'नको ते वक्तव्य'

Aiadmk Leader CV Shanmugam On Nayanthara: तामिळनाडू विधानसभा निवडणुकांदरम्यान, AIADMK चे खासदार सी.व्ही. षण्मुगम यांनी अभिनेत्री नयनतारा हिच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

Aiadmk Leader CV Shanmugam On Nayanthara: देशात विधानसभा निवडणुकांचं (Tamil Nadu Assembly Elections) बिगुल वाजलं असून पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये तामिळनाडूच्या निवडणुका एप्रिल महिन्यात पार पडणार आहेत. तमिळनाडूनमध्ये (Tamil Nadu) सत्तेत असलेल्या द्रमुक पक्षाला (DMK Party) बाजूला काढण्यासाठी इतर पक्षांनी चांगलीच कंबर कसली आहे. तमिळनाडूमध्ये द्रमुख पक्षाचा अण्णाद्रमुक पक्ष (AIADMK Party) कट्टर विरोधक आहे. अशातच, निवडणुकांच्या धामधुमीत एकमेकांवर टीकेच्या फैरी झाडताना थेट सुपरस्टार अभिनेत्रीबाबत आक्षेपार्ह्य वक्तव्य करण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. 

तामिळनाडू विधानसभा निवडणुकांदरम्यान, AIADMK चे खासदार सी.व्ही. षण्मुगम यांनी अभिनेत्री नयनतारा हिच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. DMK सह इतर राजकीय पक्षांनीही या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. सी.व्ही. षण्मुगम यांनी केलेलं वक्तव्य महिलांप्रती अपमानकारक आणि आक्षेपार्ह असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातोय. 

खरं तर स्टालिन यांच्यावर उपहासात्मक टीका करताना सी.व्ही. षण्मुगम यांनी एक प्रश्न उपस्थित केला. यावरुनच मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. स्टालिन यांच्यावर उपरोधिक टीका करताना सी.व्ही. षण्मुगम यांनी, "ज्याला कोणाला नयनताराशी लग्न करण्याचे स्वप्न पडेल, त्याची ती इच्छा सरकार पूर्ण करेल का?", असा प्रश्न विचारला आणि वादाला तोंड फुटलं. सी.व्ही. षण्मुगम यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरही मोठा गदारोळ झाला. सोशल मीडियावर नयनताराच्या चाहत्यांनी या AIADMK खासदाराला चांगलंच धारेवर धरलंय.

नेमकं घडलंय काय? 

तामिळनाडूच्या विल्लुपुरम इथे, AIADMK पक्षानं राज्याच्या स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात निदर्शनं केली. या आंदोलनात खासदार सी.व्ही. षण्मुगम यांच्यासह पक्षाचे अनेक नेते सहभागी झाले होते. या निदर्शनांदरम्यान, तामिळनाडूमध्ये लैंगिक छळाच्या घटनांना आळा घालण्यात DMK सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप AIADMK नं केला आहे. या कार्यक्रमादरम्यान, खासदार षण्मुगम यांची बोलण्याच्या ओघात 
जीभ घसरली आणि त्यांनी अभिनेत्री नयनताराबद्दल एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं. 

उपहासात्मक शैलीत बोलताना त्यांनी म्हटलं की, "अब्दुल कलाम यांनी आपल्याला स्वप्न पाहण्यासाठी सांगितलेलं... स्टॅलिन यांनी मात्र आपण पाहिलेली स्वप्न इतरांसोबत शेअर करायला सांगितलीत. जर मी असं म्हटलं की, 'मला नयनतारा हवी आहे, तर स्टॅलिन माझं हे स्वप्न पूर्ण करतील का?' किंवा जर एखाद्या व्यक्तीनं स्टॅलिन यांच्याकडे अशी मागणी केली की, 'त्याला नयनताराशी लग्न करायचं आहे, तर स्टॅलिन ते स्वप्न सत्यात उतरवतील का?"

दरम्यान, अभिनेत्री नयनताराचे सध्या इन्स्टाग्रामवर 10.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. दरम्यान, या वक्तव्यावर नयनतारानं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया किंवा निवेदन जाहीर केलेलं नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

'तिनं अ‍ॅफिडेविटमध्ये लिहावं मी सनातनी, मगच...'; अटींची पूर्तता केल्याशिवाय सारा अली खानला केदारनाथ मंदिरात 'नो एन्ट्री'

महत्त्वाच्या बातम्या

Marathi serial Mi Kaat Takli: नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
OTT Upcoming Thriller: ''पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
'पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Embed widget