Operation Sindoor : दहशतवाद्यांचे हेच अड्डे उद्ध्वस्त,इंडियन आर्मीकडून VIDEO शेअर
Operation Sindoor : दहशतवाद्यांचे हेच अड्डे उद्ध्वस्त,इंडियन आर्मीकडून VIDEO शेअर
Operation Sindoor: भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) ही मोहीम फत्ते केली. भारतीय हवाई दलानं आज (6 मे) मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्याचा बदला घेतला. मध्यरात्री 1:05 वाजता ऑपरेशन सिंदूर सुरू होऊन 1:30 वाजता ते यशस्वीरित्या पूर्ण झाले. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं. उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं
कोणकोणते दहशतवादी मारले गेले? - लष्कर ए तय्यबाचा महत्वाचा कमांडर खालिद मोहम्मद आलम - धर्मांध इस्लामिक धर्मप्रसारक आणि कोटली दहशतवादी शिबिराचा मुख्य कमांडर कारी मोहम्मद इकबाल - हिजबुल मुजाहिद्दीनचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मौलाना मसूद अजहर याचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रऊफ असगर गंभीररित्या जखमी - मौलाना मसूद अजहर याचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रऊफ असगरच्या पत्नीचा मृत्यू. - भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रऊफ असगरचा मुलगा हुजैफा यांचा मृत्यू. - याशिवाय मौलाना मसूद अजहर याच्या परिवारातील एकूण १४ लोकांचा मृत्यू. - लष्कर ए तय्यबाचे दहशतवादी वकास आणि हसन यांनाही कंठस्नान - लष्कर ए तय्यबाचा मोस्ट वॉन्टेड अब्दुल मलिक आणि मुदस्सिर यांचा खात्मा. 'ऑपरेशन सिंदूर'ची वैशिष्ट्ये- 1. पाकिस्तानच्या रडार यंत्रणेला कळू न देता हल्ला 2. भारतानं दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्याची पाकची कबुली 3. पाकव्याप्तच नव्हे पाकिस्तानातले अड्डेही उद्धवस्त 4. दहशतवादी अड्ड्यांची माहिती अचूक होती हे सिद्ध 5. ९ तळांवरील हल्ल्यात शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा 6. भारतीय हवाई हल्ल्यांत एकाही नागरिकाला इजासुद्धा नाही 7. आंतरराष्ट्रीय सीमा रेषा ओलांडून भारताचे हल्ले























